अहमदनगर - राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) हे अहमदनगर येथील एक कुस्ती स्पर्धा व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना त्यांनी राणा दाम्पत्यावर त्यांच्या खास शैलीत टीका केली. ( Addressing the Rana couple, Balasaheb Thorat said that the people of Maharashtra would not like it )
मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयात इम्पेरिकल डाटा सादर करून मिळविले. महाराष्ट्रातील सरकार हा डाटा केव्हा सादर करणार या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. हा डेटा लवकरच सादर करण्यात येणार आहे. मला खात्री आहे की राज्यातील ओबीसी आरक्षणा बाबतही चांगला निर्णय होईल. ओबीसींना न्याय देणारा निर्णय होईल.
राणा दाम्पत्याकडून मुख्यमंत्र्यांवर होत असलेल्या टीके बाबत मंत्री थोरात यांनी सांगितले की, विनाकारण अशा लोकांना फार महत्त्व देऊ नये. मुख्यमंत्री हा प्रत्येक पक्षाचा असतो. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचा सन्मानपूर्वकच उल्लेख केला जात असतो. आपला इतिहास तसा आहे. महाराष्ट्रात अशी जोडी आहे की, जी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरते. महाराष्ट्रातील जनतेला हा आवडणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
एक पक्षाचे सरकार असले तरी प्रश्न हे असतातच. आमदारांवर जनतेच्या मागण्यांचा खूप दबाव असतो. त्यांना त्यासाठी निधीचा शोध घ्यावा लागतो. आमचे तीन पक्षाचे सरकार आहे. आमच्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांना निधी मिळाला पाहिजे, समान वागणूक मिळाली पाहिजे. ही तक्रार फक्त काँग्रेसची नाही. ज्या ज्या पक्षाच्या आमदारांना कमी निधी मिळाला त्यांची ही तक्रार आहे. ज्या आमदारांना कमी निधी मिळत आहे. त्यांना जास्त निधी मिळाला पाहिजे असा आमचा आग्रह आहे. त्यात काँग्रेसच्याही आमदारांना निधी मिळावा अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.