Karmala News : आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरुन पेटलेला वाद आणि बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे विरुद्ध मंत्री तानाजी सावंत यांच्यातील राजकीय आरोप प्रत्यारोपांनी करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे. सोलापूर जिल्ह्यात आदिनाथ कारखान्याचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. या कारखान्याच्या कारभाराचा गाडा हाकण्यासाठी मंत्री सावंत यांच्या मर्जीतील प्रशासक नेमले असे आरोप केले जात होते.
बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी मंत्री तानाजी सावंतांवर केलेल्या टिकेनंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत पाच सल्लागारांची नेमणूक झाली. हे सल्लागार कारखान्याला आर्थिक, ऊस पुरवठा आणि यंत्रणा पुरवठा या संकटातून कशा पद्धतीने बाहेर काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाच सल्लागारांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास आदिनाथ भवितव्य उज्वल असेल अन्यथा आदिनाथ पुन्हा अंधारातच अशी चर्चा करमाळ्यात होताना दिसत आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना आदिनाथ साखर कारखाना हा स्वतः च्याच ताब्यात घ्यायचा आहे. त्यासाठीच ते कारखाना जास्तीत जास्त कसा अडचणीत येईल यासाी प्रयत्न करत आहेत, असा आरोप बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष गुळवे यांनी केला होता. हा कारखाना बारामती अॅग्रोने भाडेतत्त्वावर घेतलेला असताना जाणीवपूर्वक राजकारण करून तो बारामती अॅग्रोला देण्यास विरोध केला. आजही हा कारखाना किती क्षमतेने चालतो? असा प्रश्न करतानाच त्यांनी आदिनाथ कारखाना वाचवायचा असेल तर सावंतांनी स्वतःच्या कारखान्याची यंत्रणा पुरवली पाहिजे, असे म्हटले होते. (Baramati Agro)
सावंतांनी आदिनाथवर प्रशासक आणून प्रशासकांना आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचे काम करत आहेत. प्रशासक म्हणून नेमण्यात आलेले शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे कारखाना सावंतांच्या घशात कसा घालता येईल? यासाठी सर्व वातावरण निर्मिती करत आहेत, असाही आरोप केला होता. आदिनाथला यंत्रणा पुरवावी म्हणून प्रशासक नेमलेले पवारांच्या दारात फेऱ्या मारत आहेत’, असाही आरोप गुळवेंनी केला होता.(Adinath Sugar Factory)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानंतर गुरुवारी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे यांनी तालुक्यातील पाच जणांची कारखाना सल्लागार पदी नियुक्ती केली आहे. यामध्ये कोंढारचिंचोलीचे सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे, आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, माजी आमदार नारायण पाटील गटाचे नेते धुळाभाऊ कोकरे, आदिनाथ बचाव समितीचे डॉ. वसंतराव पुंडे, केमचे अच्युत तळेकर पाटील यांची नियुक्ती झाली आहे, असे सांगितले जात आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.