Pratap Sarnaik-Nitesh Rane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pratap Sarnaik : फडणवीस, नारायण राणेंनंतर सरनाईकांनीही नीतेश राणेंना सुनावले; म्हणाले ‘त्यामुळे आमचा बाप कोण?, हे सांगायची गरज नाही’

Nitesh Rane Statement : बच्चू कडू यांच्यासोबत मी काल चर्चाही केली आहे. मी बच्चू कडूंशी बोलल्यानंतर त्यांनी माझी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घाला, असे सांगितले आहे.

Vijaykumar Dudhale, विश्वभूषण लिमये

Solapur, 12 June : कोणी कितीही ताकद दाखवली किंवा कोणी कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत, असे विधान करणारे राज्याचे मत्स्ये आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांना शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनंतर सरनाईकांनीही नीतेश राणेंना सुनावले. ‘आम्ही आमच्या आई-बापाचं नाव घेऊनच आमचं नाव बोर्डावर लावत असतो, त्यामुळे आमचा बाप कोण, हे सांगायची किंवा बघायची गरज नाही, असे सरनाईकांनी राणेंना सुनावले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी नीतेश राणेंच्या (Nitesh Rane) त्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत भाष्य केले आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी त्यांचे कान टोचले आहेत. वडिलांना पूर्ण अधिकार असतो.. मुलाने काही चुका केल्या, तर कान टोचण्याचा अधिकार बाप म्हणून असते.

मुख्यमंत्र्यांनी धाराशिवच्या निधीला स्थगिती दिली आहे, त्याबाबत मी दहा तारखेला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे, त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे, असे सांगून राज्यातील महिला अत्याचाराबाबत घडणाऱ्या घटना निश्चितपणे योग्य नाहीत. एक मंत्री म्हणून अशा घटना राज्यात होऊ नये, अशा मतांचा मी आहे. कुठल्या आधारे आत्महत्या आणि घटना होतात, याची निश्चित चौकशी झाली पाहिजे. या सर्व घटनांची माहिती घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवू, असेही प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी नमूद केले.

प्रताप सरनाईक म्हणाले, बच्चू कडू यांच्या आंदोलनावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगसाठी बच्चू कडू काम करत आहेत. बच्चू कडू यांच्यासोबत मी काल चर्चाही केली आहे. त्यांच्या आंदोलनाबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा आणि आंदोलन संपवावं. मी बच्चू कडूंशी बोलल्यानंतर त्यांनी माझी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घाला, असे सांगितले आहे.

बच्चू कडू हे एक सामाजिक संघटनेत कामं करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आमच्या सोबत मंत्रिपदही भूषवलं आहे. बच्चू कडू यांचा मंत्र्यांसोबत समन्वय आहे. शेतकऱ्यांच्या भूमिकेबद्दल ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करतील आणि उपोषण संपेल, याची मला खात्री आहे, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

सरनाईक म्हणाले, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला मी जाणार आहे. कारण, मला वैभवी देशमुख हिचं कौतुक आहे. कुटुंबात अशी परिस्थिती असताना, वडिलांचे छत्र नसतानाही त्या मुलीने मेहनत घेऊन 85 टक्के गुण मिळविले आहेत. तिचं कौतुक करण्यासाठी मी आज मस्साजोगला जात आहे. तसेच, त्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, या मताचा मी आहे. सरकारच्या माध्यमातूनही कुटुंबीयांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT