Dhairyasheel Mohite Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mohite Patil : एक्झिट पोलनंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी माढ्यातील मताधिक्क्याचा थेट आकडाच सांगितला...

Exit Poll Lok Sabha Election 2024 : टीव्ही नाईन आणि पोलस्ट्राट एक्झिट पोलच्या अंदाजानुसार माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर आहेत, अशी शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आलेली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 02 June : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर राहतील, असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर मोहिते पाटील यांनी माढ्यातून 80 हजार ते एक लाख 30 हजाराच्या मताधिक्क्याने विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

टीव्ही नाईन आणि पोलस्ट्राट एक्झिट पोलच्या अंदाजानुसार माढ्यात (Madha) धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे आघाडी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) हे पिछाडीवर आहेत, अशी शक्यता या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) वर्तविण्यात आलेली आहे. त्यानंतर माध्यमाशी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातील लीडच सांगून टाकले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहिते पाटील म्हणाले, सर्वच एक्झिट पोलमध्ये मला आघाडीवर दाखवले आहे. मला खात्री आहे की माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मला मनापासून मतदान केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी मला मतदान केले आहे. मला खात्री आहे की, पवारसाहेब आणि विजयदादांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे माझा विजय निश्चितपणे होणार आहे.

महाविकास आघाडीच्या राज्यात 30 ते 32 जागा येतील, असा प्राथमिक अंदाज आहे. त्या पद्धतीचे वातावरण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालं होतं. आम्ही निवडणुकीच्या वेळी सांगितल्याप्रमाणे बारामती, सातारा, माढा, सोलापूर या चार जागा महाविकास आघाडीच्या शंभर टक्के निवडून येणार, अशी आम्हाला खात्री आहे, असा विश्वासही धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्याच्या मतदानानंतर देशभरातील विविध वृत्तसंस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यात माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर राहतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर बोलताना मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून मी साधारणपणे 80 ते एक लाख 30 हजार मताधिक्क्याने निवडून येणार आहे, असा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT