Solapur, 08 April : विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे बॅकफूटला गेलेले माजी आमदार संजय शिंदे हे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाले आहेत. त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर संजयमामा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांच्यासोबत असलेले साखर उद्योगातील बडी असामी कारखाना निवडणुकीत सोबत आल्याने संजयमामांना मोठे बळ मिळाले आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून (Adinath Sugar Factory election) माजी आमदार जयवंतराव जगताप आणि बागल गटाने माघार घेतली आहे, त्यामुळे कारखाना निवडणुकीच्या रिंगणात तीन पॅनेल असले तरी मुख्य लढत ही आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे या आजी माजी आमदारांच्या पॅनेलमध्ये होत आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी नारायण पाटील गटाला पाठिंबा दिला आहे. तसेच मोहिते पाटील यांनीही नाारायण पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. बागल गट हा तटस्थ आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांच्या सोबत असणारे बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्या सोबत आहेत, त्यामुळे शिंदे यांची ताकद नक्कीच वाढली आहे.
दरम्यान, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजितदादांनी बंद असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मदत करण्याचा शब्द दिला आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरून आर्थिक मदत देण्याचेही स्पष्ट केले आहे, त्यामुळे अजितदादांकडून बळ मिळाल्याने संजयमामा मोठ्या जोमाने सुरू आहे.
माजी आमदार संजय शिंदे यांनी कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेऊन तीन तारखेपासून प्रचाराला सुरुवात केली. मात्र, अजितदादांच्या भेटीनंतर संजयमामांनी जोरदार पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. करमाळा तालुक्यातील संगोबा येथील आदिनाथ मंदिरातून माजी आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे.
आजितदादांच्या मदतीतून राज्य सरकारकडून अर्थिक मदत घेऊन कारखाना चालू करण्यात येईल, असे संजय शिंदे हे प्रचारात सांगत आहेत. सर्वांत म्हणजे गोष्ट निवडणुकीच्या रिंणगात सुभाष गुळवे यांची मोठी मदत संजय शिंदेंना होणार, हे निश्चित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.