Satara Bribe
Satara Bribe 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीनंतर सातारा आरटीओतील हप्तेखोरीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल....

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

Satara Bribery news सातारा : सांगलीनंतर साताऱ्यातील आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार्यालयातील कर्मचारी आणि एजंटमधील संभाषणाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

सांगलीत आरटीओ अधिकाऱ्यानं पैसे मागितल्यानंतर एकानं थेट कपडेच काढून दिल्याचं प्रकरण ताजे आहे. आता साताऱ्यातही आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचाराचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होऊ लागलाय. परराज्यात तपासणी झालेल्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी पैसे वाढवून घेण्याबाबतचा संवादाच्या या व्हिडीओमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

आरटीओ कार्यालयातील एक कर्मचारी आणि एजंट यांच्यातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये कामासाठी अगोदर साहेब पाचशे रुपये घेत होते, आता ते दोन हजार मागत आहेत, अशा प्रकारचा हा संवाद झाला आहे. 186 गाड्यांसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये मगितल्यानं साताऱ्यातील आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. आता याची पालकमंत्री आणि मुख्यमंत्री चौकशी करणार का याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, 12 ऑक्टोबरला सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये आरटीओ अधिकाऱ्याने तरुणाकडे लाच मागितल्यानंतर संतापलेल्या तरुणाने स्वत:चे कपडे उतरवून देण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सांगली पोलिस दलात खळबळ उडाली होती.  

पण शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित तरुणावर वरच कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरटीओ कॅम्पमध्ये ट्रॉली पासिंगसाठी आपल्याकडे लाच मागितल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता.

अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याने प्रमोदचा पारा चांगलाच चढला. त्याने थेट अधिकाऱ्यांसमोर आपले कपडे उतरवून देण्यास सुरुवात केली. त्याचा हा प्रकार पाहून अधिकारीही बावचळले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT