Laxmikant Thonge Patil-Shivaji Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिंदे गटात शह-कटशह : कोकाटे, ठोंगे, साठेंच्या निवडीनंतर सावंत गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

शिवाजी सावंत यांची शिंदेसेनेच्या सोलापूर जिल्ह्याच्या (संपूर्ण) संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सोलापुरात (Solapur) सर्व काही आलबेल आहे, असे काही दिसत नाही. जिल्ह्यात सावंत गट आणि इतर असे दोन गट पडल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, संजय कोकाटे आणि महेश साठे यांच्या निवडीनंतर सावंत गटाने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे धाव घेत सोलापूर जिल्ह्याच्या (संपूर्ण) संपर्कप्रमुखदी शिवाजी सावंत यांची वर्णी लावून घेतली आहे. त्यामुळे सावंत गटाने पुन्हा एकदा कोकाटे, साठे आणि ठोंगे पाटील यांना धोबीपछाड दिल्याची चर्चा सोलापुरात रंगली आहे. (After the election of Kokate, Thonge, Sathe, the Sawant group runs to the Chief Minister)

आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि आमदार शहाजी पाटील यांच्या अनुपस्थितीत लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांची जिल्हाप्रमुखपदी (सांगोला आणि माढा तालुका) निवड करण्यात आली हेाती. तसेच, माढा लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखदी संजय कोकाटे, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी महेश साठे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. विशेष म्हणजे या तिघांचे नियुक्तीचे पत्र मध्यरात्री दोन वाजता शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी दिले होते.

दरम्यान, या तिघांच्या नियुक्तीनंतर सावंत गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. या निवडी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या अनुपस्थितीत करण्यात आल्याबद्दल या गटाने नाराजी व्यक्ती करत यापुढे निवडी होताना सर्वांना विश्वासात घेऊनच व्हाव्यात, अशी विनंती सावंत गटाकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. यावेळीच शिवाजी सावंत यांची सोलापूर जिल्ह्याच्या (संपूर्ण) संपर्कप्रमुखदी निवड करण्यात आली. त्यामुळे सावंत यांच्याकडे सोलापुरात शिंदेसेनेची सर्व सूत्रे असणार हे आता स्पष्ट झाले आहे.

सोलापुरात सावंत गटाकडून शिंदे गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीलाही लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, माढ्याचे संजय कोकाटे, मोहोळचे नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर हे गैरहजर हेाते. त्यामुळे शिंदे गटात अवघ्या दोन महिन्यांत गटबाजी उफाळल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT