Nitesh Rane News
Nitesh Rane News 
पश्चिम महाराष्ट्र

राऊतांनी ठाकरे घराण्यानंतर आता छत्रपतींच्या घरातही आग लावली; नितेश राणेंचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर (Shivsena) आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका करताना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची पातळी सातत्याने घसरताना दिसून येत आहे. आज मिरजमधल्या एका सभेत बोलताना आमदार राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. (Nitesh Rane News)

असे असतानाच नितेश राणेंनी खासदार संजय राऊत यांच्यावरही धक्कादायक आरोप केला आहे. “संजय राऊत यांनीच उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात आग लावली आणि आता छत्रपतींच्या घरातही आग लावण्यापर्यंत संजय राऊतांची मजल गेली,” असा धक्कादायक आरोप नितेश राणे यांनी केला.

“उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात संजय राऊत यांनीच भांडणे लावली. त्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची गाडी जाळली होती. या दोन भावांमध्ये भांडणे लावल्यानंतर आता ते छत्रपतींच्या घरातही आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. दहा मिनिटांसाठी त्यांचे सुरक्षा रक्षकांना बाजूला काढा आणि मग मराठा समाजाने त्यांचा ताबा घेतला पाहिजे,” असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.

दरम्यान, सांगलींमध्ये बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावरही टिका केली होती. “देवेंद्र फडणवीसांच्या पाठित खंजीर खुपसून त्यांना फसवून त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना भाजपचं सरकार सत्तेत येईल, त्याला तुम्ही मोदींचा फोटो लावा, तुमचा फोटो लावा आणि राज्यात एकत्र सत्ता स्थापन करु, असा शब्द उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला. पण प्रत्यक्षात सत्ता आल्यानंतर शब्द पडू न देणारे मुख्यमंत्री राज्यात बसलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं ते मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्ष ते राज्य करत आहेत.”

महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्राला पनवती लागून आज अडीच वर्षे झाली आहेत. *** मुख्यमंत्री राज्याला मिळालेला आहे. *** माणसाची अडीच वर्षे झाली. उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना फसवलं. कुठलंही विकासकाम महाराष्ट्रात होत नाही. फक्त लोकांना लुटण्याचा एककलमी कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू आहे, अशी टीकाही आमदार राणे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT