Eknath Shinde, Raghunathdada Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sugarcane FRP News : शेतकरी संघटना आक्रमक; ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे शिमगा आंदोलन...रघुनाथ पाटील

Shetkari Sanghatna शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष वसीम इनामदार यांच्या अन्नत्याग आंदोलनास रघुनाथ पाटील यांनी भेट दिली.

Umesh Bambare-Patil

Sugarcane FRP News : यंदा उसाला पाच हजार रुपये प्रतिटन दर द्यावा आणि मागील वर्षीची बाकी दिवाळीला टनाला एक हजार रुपये द्यावे. ते जर जमत नसेल तर दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट काढून टाकून आम्हाला कारखाने काढायला परवानी द्या. ही मागणी जर मान्य नाही झाली तर मंत्री, आमदार, खासदार आणि साखर सम्राटांची दिवाळी आणि शेतकऱ्यांचा शिमगा आंदोलन असेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज येथे दिला.

शेतकरी संघटनेचे Shetkari Sanghatna तालुकाध्यक्ष वसीम इनामदार यांनी तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनास संघटनेचे नेते रघुनाथ पाटील Raghunathdada Patil यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, साखरेचे दर सध्या बऱ्यापैकी आहेत. पाऊस नाही आणि उसाची लागण कमी आहे.

अशा परिस्थितीत उसाचे भाव शेतकऱ्यांना चांगले मिळाले पाहिजेत, यासाठी आम्ही पाच हजार रुपयांची मागणी केली आहे. मागील वर्षीच्या उसाच्या साखरेचे ३१०० रुपये भाव कारखानदारांनी ठरवले आहेत. आज ३८०० रुपये साखरेचे भाव चालले आहेत.

कारखानदार मागील वर्षीचीच साखर विकत असल्याने सध्या दिवाळीला एक हजार रुपये टनाला दिले पाहिजेत. पुढील वर्षीचे पाच हजार रुपये प्रतिटन दर मिळाला पाहिजे. हे जर कारखान्यांना जमत नसेल तर दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट काढून टाकली पाहिजे. उसाला भाव देत नाहीत आणि कारखानेही काढून देत नाहीत. maharashtra political news

त्यामुळे घरी आई जेऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही, अशा दुहेरी पेचात शेतकऱ्याला ठेवले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढायला नको असतील तर पाच हजार रुपये दर द्या किंवा दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट काढून टाका, अशी आमची मागणी आहे. मागणी मान्य झाली नाही तर मंत्री, आमदार, खासदार आणि साखर सम्राटांची दिवाळी आणि आमच्या शेतकऱ्यांचा शिमगा आंदोलन असेल, असाही इशारा त्यांनी या वेळी दिला.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT