Ahmednagar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar News : सरपंच-ग्रामसेवकाने उकरली मुरुम; तहसिलदारांनी ठोठावला 10 लाखांचा दंड; गावात एकच चर्चा...

Pradeep Pendhare

Samgamner News : सरपंच आणि ग्रामसेवकाने केलेल्या अवैध मुरूम उत्खननप्रकरणी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी जोरदार दणका दिला. मुरूमाचे अवैध उत्खनन करून त्याची विक्री केले म्हणून संगमनेर तालुक्यातील कुरण गावच्या सरपंच आणि ग्रामसेवकाला 10 लाख 58 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Kuran Gram Panchayat News)

कुरण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गट क्रमांक 257 मधून अवैधरित्या मुरूम उत्खनन झाले होते. याची तक्रार गफ्फार सत्तार शेख यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. याची दखल घेत कारवाईची सूचना करण्यात आली. समनापूरचे मंडळाधिकारी यांना याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या. मंडलाधिकारी यांनी पंचनामा करत 18 मे 2023 अहवाल सादर केला. यात सरपंच आणि ग्रामसेवकांनी मिळून मुरूमाचे अवैध उत्खनन केल्याचे समोर आले.

तहसीलदार धीरज मांजरे यांना अवैध मुरूम उत्खननाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदींनुसार कुरण गावचे सरपंच आणि ग्रामसेवकाला तब्बल 10 लाख 58 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईनुसार पाच पट रक्कम मोजावी लागणार आहे. 2 हजार 400 रुपये प्रतिब्रास याप्रमाण 84 ब्रास मुरूमाचे बाजारभावाप्रमाणे पाचपट किंमत 10 लाख 8 हजार आणि रॉयल्टी रक्कम 50 हजार 400, असा एकूण 10 लाख 58 हजार 400 रुपयांचा दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. (Latest Marathi News)

अलीकडच्या काळात सरंपच (Sarpanch) आणि ग्रामसेवकाविरोधात थेट तहसीलदारांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेली दंडाची कारवाई ही पहिलीच आहे. त्यामुळे या कारवाईची जिल्ह्याभरात चर्चा होत आहे. या कारवाईमुळे आता तालुक्यातील अनेक ग्रामसेवक - सरपंच यांचे धाबे दणाणले आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT