Ramraje Naik Nimbalkar, Sanjivraje Naik Nimbalkar, Ajit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara NCP News : अजितदादांनी दिली रामराजेंच्या बंधूंवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी....

Umesh Bambare-Patil

Satara NCP News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्षपदी फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही निवड जाहीर केली. या निवडीतून माढा व सातारा लोकसभेवर या गटाचे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे. या निवडीबद्दल संजीवराजे यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत NCP उभी फूट पडली. तीन आमदार अजित पवारांसोबत राहिले तर दोन आमदार आणि एक खासदार शरद पवार यांच्या गटासोबत राहिले, तर राष्ट्रवादी भवन शरद पवारांच्या गटाकडेच आहे.

या फुटीनंतर अजित पवार गटाकडून जिल्ह्यात पक्ष बांधणी सुरू करण्यापूर्वी पदाधिकारी निवडी करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतला. सातारा जिल्ह्याची जबाबदारी कोणावर दिली जाणार याची उत्सुकता होती. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरच जिल्हाध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली.

या निवडीतून रामराजे यांनी माढा मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यावर आपली कमांड कायम ठेवली आहे. आगामी लोकसभेसाठी माढा व सातारा या दोन्ही मतदारसंघांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या माध्यमातून माजी सभापती रामराजे यांचे वर्चस्व राहणार आहे.

या निवडीबद्दल संजीवराजे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, युवा नेते अमित कदम, नंदकुमार मोरे, मनोज पोळ, सुरेंद्र गुदगे आदींनी अभिनंदन केले आहे.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT