Sitaram Gaikar & Ajit Pawar
Sitaram Gaikar & Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अजितदादा मला म्हणाले, तुम्ही व्यवस्थित अगस्ती कारखाना चालवा

शांताराम काळे

अकोले ( अहमदनगर ) : अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. यातच ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी कारखान्यातील विद्यमान सत्ताधारी संचालकांवर आरोप केले होते. या आरोपांना कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिले आहे. Ajit Dada told me, you should run Agastya factory properly

पत्रकार परिषदेच्या यावेळी जेष्ठ संचालक मिनानाथ पांडे, प्रकाश मालुंजकर, अशोक देशमुख, मच्छिन्द्र धुमाळ, बाळासाहेब देशमुख, रामनाथ वाकचौरे, गुलाबराव शेवाळे, महेश नवले, राजेंद्र डावरे, बाळासाहेब ताजने, कचरू शेटे, सुनील दातीर, कार्यकारी संचालक अजित देशमुख, मुख्य लेखापाल एकनाथ शेळके आदी उपस्थित होते.

सीताराम गायकर म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित पवार यांना मी स्पष्ट विचारले की, दादा तुम्ही अगस्ती बाबत कोणाला शब्द दिला का? दिला असेल तर मी थांबतो तर अजित पवार म्हणाले की, मी कोणालाही शब्द दिलेला नाही, उलट तुम्ही विचलित होऊ नका, तुम्ही व्यवस्थित अगस्ती कारखाना चालवावा असे अगस्ति सह साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी सांगितले. तसेच कारखान्याच्या कारभाराची चौकशी चालू असून त्याचा अहवाल येऊ द्या,आम्ही दोषी असलो तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत. कोणीही विषारी प्रचाराला बळी पडू नका असे आवाहन त्यांनी सभासदांना केले.

गायकर पुढे म्हणाले की, काही सभासद हे वर्षभर अगस्ती संदर्भात अनेक चर्चा, अफवा व गैरसमज पसरवीत आहेत. त्यामुळे अगस्ती चालू होतो की नाही याबाबत सभासद, लेबर यांच्यामध्ये साशंकता होती. काही पार्ट पेमेंट बाकी होते. कर्मचाऱ्यांचे पगार देणे बाकी होते. हे सर्व पेमेंट करण्यासाठी संचालक व काही विभाग प्रमुखांच्या नावावर 6 कोटी 11 लाख कर्ज काढले. जिल्हा बँकेकडून अल्पमुदत कर्ज मिळाल्यानंतर सर्व करार पूर्ण केले, असे असतानाही काही सभासदांनी संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. कर्जविषयी चर्चा करून सभासदांमध्ये गैरसमज पसरून दिले, असे स्पष्टीकरण गायकर यांनी दिले.

मागील 25 वर्षे अगस्ती कारखाना चालविताना 1 लाख टन, दीड लाख टन, 3 लक्ष टन असे गाळप केले. त्यावेळी उत्पन्न कमी होते मात्र पगार, मेंटनन्स, व्याज व इतर खर्च चालूच होते. त्यामुळे तोटा वाढत गेला. गाळप क्षमता वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून गेटकीनचा ऊस आणला. त्यावेळीही टीका केली. पूर्ण क्षमतेने कारखाना चालविला नाही तर तोटे वाढले असते. अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती याचाही परिणाम झाला. 10 वर्षपूर्वी राज्य सहकारी बँकेने कर्ज वाटप बंद केले. जिल्हा सहकारी बँक ही कर्ज देत नव्हती अशाही परिस्थितीत कारखाना व्यवस्थित चालविला. अगस्ति कारखाना जिल्ह्या बँकेकडे घ्यावा असे आग्रह धरला. त्यामुळे अगस्तीला जिल्हा बँकेने मदत केली. तेव्हापासून अगस्ती व्यवस्थित चालू आहे, असे सीताराम गायकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT