Ajit Pawar Sarkarnana
पश्चिम महाराष्ट्र

बाबांनो, मी खूप अनुभवलंय...तोलून मापून बोला : अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

एखादा शब्द चुकून गेला तर चव्हाणसाहेबांच्या समाधीसमोर दिवसभर बसावं लागतं.

सरकारनामा ब्यूरो

सांगली : काम करत असताना काही गोष्टी आपल्याला स्पष्ट बोलाव्यात, असं वाटत असतात. पण, त्यातून अडचणी निर्माण होणार असतील, तर ते बोलण्याच्या नादी लागू नये. त्याचा फटका बसतो. मी तर खूप अनुभवलंय. कधी कधी तर एखादा शब्द चुकून गेला तर चव्हाणसाहेबांच्या समाधीसमोर दिवसभर बसावं लागतं, हे मी मागं अनुभवलेलं आहे. त्यामुळे फार तोलून मापून बोललं पाहिजे आणि वागलं पाहिजे. हे कायम स्मरणात ठेवा, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिला. (Ajit Pawar advises activists to speak carefully)

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे यशवंतराव चव्हाण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, राजकारणात फार कष्ट करावे लागते, त्याला नशिबाची साथही असावी लागते. मी तसा नास्तिक आहे. पण इथे नृसिंहवाडीच्या जागृती देवस्थानला गेलो आणि दर्शन घेतले. अलीकडे राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडे शत्रू म्हणून बघितले जात आहे. हे या आधी महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते.

आज देशात काय परिस्थिती आहे. सध्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची देशाला गरज आहे. समाजात तेढ निर्माण केली जात आहे. समाजात दिशाभूल करणाऱ्यांना रोखले गेले पाहिजे. तो कुठल्याही जातीचा अथवा पक्षाचा असो, त्याला अटकाव घालण्याची गरज आहे. नव्या पिढीला यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार समजून सांगण्याची गरज आहे. अलीकडे राजकीय प्रतिस्पर्ध्याकडे शत्रू म्हणून बघितले जात आहे. हे आधी कधीच घडले नव्हते. सुसंस्कृत महाराष्ट्रची पुन्हा परंपरा आणण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पवार यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT