सातारा : वडुज येथील कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी कार्यक्रमात भाषण करताना मी पाच वर्षे इथं जिल्हाधिकारी म्हणून काम केलं, असे उपमुख्यमंत्री अजित पवार गडबडीत बोलले. यामध्ये सुधारण करत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चिठ्ठी पाठवून दादांच्या लक्षात आणून दिली. त्यावर श्री. पवार यांनी मागे झालेल्या चुकीची आठवण करून देत चव्हाण साहेबांच्या समाधीपुढे चुकीची कबुली दिली होती. आज त्यांनी बाळसाहेब पाटलांकडे पाहात हात जोडत साहेब चुकलं म्हणत चुकीची कबुली दिली.
वडूज (ता. खटाव) येथील कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाषण करत असताना मी पाच वर्षे इथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलंय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार गडबडीत बोलले. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांना त्यांची चुक चिठ्ठी पाठवून लक्षात आणून देत जिल्हाधिकारी नव्हे तर पालकमंत्री असे हवे असे सांगितले.
त्यानंतर अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी करत जिल्हाधिकारी एवढं कुठं शिकलोय, अस म्हणत खूप दिवसांनी एवढीशी चूक झाली. मागे फार मोठी चूक झाली होती. तेव्हा कराडात यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी पुढे बसून साहेब चुकलं.., साहेब चुकलो अस म्हणालो. असे म्हणताच उपस्थितांत एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे बघून हात जोडत, साहेब चुकलं असे म्हणत चुकीची कबुली दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.