Ajit Pawar
Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आज मी राज्याचा उपमु... अर्रर्र, चुकलं, चुकलं... : माध्यमांशी बोलताना अजित पवार गोंधळले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात सत्तांतर होवून ३५ दिवस झाले आहेत. या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली आहे. तर विरोधी पक्ष नेतेपदी अजित पवार यांचे आगमन झाले आहे. मात्र हे बदललेले समीकरण ३५ दिवसांनंतरही अद्याप अजित पवार यांच्या सवयीचे झालेले नसल्याचे दिसून आले आहे.

कारण आज बारामती दौऱ्यावर असताना अजित पवार माध्यमांशी बोलताना काहीसे गोंधळलेले पाहायला मिळाले. त्यांनी सवयीप्रमाणे स्वतःचा उल्लेख राज्याचे उपमुख्यमंत्री असा केला, पण सावरुन घेत त्यांनी पुन्हा विरोधी पक्ष नेते असा उल्लेख केला.

नेमके काय घडले?

अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी केली. दौऱ्यादरम्यान, अजित पवार यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी त्यांना परमबीर सिंह वसुली प्रकरणात निलंबित डीसीपी पराग मनेरे यांचं निलंबन रद्द करुन त्यांना पुन्हा सेवेत घेतल्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, "मला त्यासंदर्भात काही माहिती नाही. मी कालपासून दौऱ्यावर आहे. मी मुंबईत गेल्यानंतर त्याबाबत माहिती घेईन. आज मी राज्याचा उपमु... असे उपमुख्यमंत्री म्हणता म्हणता थांबले अन् विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्याशी बोलत आहे. त्यामुळे मी पूर्ण माहिती घेऊन त्याआधारे स्टेटमेंट करेन. मी गेल्यानंतर सोमवारी त्याबद्दल माहिती घेईन." असे वक्तव्य केले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT