Eknath Shinde, Sangram Jagtap Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangram Jagtap News : अजित पवार गटाच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'मराठा आरक्षण मिळाले नाही, तर...'

Protest For Maratha Reservation : नगर शहरात मराठा आरक्षणासाठी दोन तास रास्ता रोको आंदोलन

Sunil Balasaheb Dhumal

Ahmednagar Political News : जालन्यात मराठा आरक्षणासाठी दोन आठवड्यांपासून आंदोलन सुरू आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारने एका महिन्यांचा वेळ मागितला आहे. हा वेळ देताना नियुक्त समितीचा अहवाल काहीही आला तरी सरकार आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागेल, अशी अटही जरांगेंनी ठेवली आहे. आरक्षणावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची सर्व तयारी केल्याचे दिसत आहे. यातच सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनीही सरकारला मराठा आरक्षणावरून इशारा दिला आहे. यामुळे सरकारला घराचा आहेर मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Latest Political News)

'मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर सत्तेत असूनही सरकारविरोधात भूमिका घ्यावी लागेल', असे सूचक विधान आमदार जगतापांनी केले आहे. आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. याच धर्तीवर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी नगरच्या कायनेटिक चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला होता.

या आंदोलनात नगर शहरासह जिल्ह्यातील मराठा तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी 'एक मराठा - लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचं..' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तब्बल दोन तास हे आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनात आमदार संग्राम जगतापांनीही सहभाग घेतला होता.

राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देताना आमदार जगताप म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भूमिका योग्य आहे. राज्यातील मराठा समाजारा आरक्षण देवून सरकार दिलासा देईल. मात्र मराठा समाजाबाबत आमच्या सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर सत्तेत असलो तरी आम्हालाही वेगळी भूमिका घ्यावी लागेल." आमदार जगतापांनी भरसभेत आपल्याच सरकारविरोधात केलल्या विधानामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवी आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा झालेला संवादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे सरकार आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची टीका होत असल्याने सरकारच्या अडचणीत भर पडताना दिसत आहे. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टीकरण दिले असले तरी विरोधक टीकेची झोड उठवत आहेत. अशा वातावरणात स्वकीय आमदाराने घेतलेल्या भूमिकेमुळे सरकार मराठा आरक्षणाबाबत महिन्यात काय भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT