Ajit Pawar News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजित पवारांनी सत्तेत सहभागी होताना शिंदे -फडणवीसांसमोर ठेवली होती 'ही' अट !

Maharashtra Politics : " मी-मी म्हणणाऱ्यांची फाटते,पण..."

Deepak Kulkarni

Madha News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीला आता काही महिने उलटले,तरीदेखील शरद पवार आणि अजित पवार गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहे. रोज नवनवे दावे- प्रतिदावे केले जात आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच सत्तेत दाखल होण्यापूर्वी शिंदे- फडणवीसांना अट घातली होती. खुद्द अजित पवारांनीच जाहीर सभेत याची कबुली दिली आहे.

माढ्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले,सत्तेत सहभागी होताना आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं, साधारण शिंदे गटाचे जेवढी मंत्रिपदं असतील, तेवढी मंत्रिपदं आम्हालाही मिळावीत.कारण त्यांचेही ५० आमदार आहेत आणि आमचेही तेवढेच आमदार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवार म्हणाले, सध्याच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त आमदार भाजपाचे आहेत.त्यांच्या पक्षाचे १०६ आणि बाहेरून पाठिंबा देणारे ९ असे एकूण ११५ आमदार भाजप विचाराचे आहेत. पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीचे ९ सहकारी मंत्रिमंडळात घेतले. मात्र, भाजपाची संख्या अधिक असल्यामुळे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार हे त्रिवार सत्य असल्याचेही अजितदादांनी मान्य केलें.

" मी-मी म्हणणाऱ्यांची फाटते,पण..."

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या कार्यक्रमातील आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. ते म्हणाले, राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. त्यांचे वरिष्ठ पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय होत असतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या काही जागा मिळतील, त्यातून तुम्हाला नाराज करणार नाही असा शब्दही दादांनी भाषणात दिला.

एवढाच शब्द मी तुम्हाला देतो.कारण सहा-सहा वेळा निवडून येणं,ही साधी सोपी गोष्ट नाही.एकदा निवडून आल्यानंतर दुसऱ्यांदा निवडून येताना मी-मी म्हणणाऱ्यांची फाटते.पण आम्हाला माहीत आहे, माणसं कशी सांभाळावी लागतात असेही अजित पवारांनी सांगितले.

"...तेव्हा आम्ही गप्प बसलो!"

अजित पवारांनी या सभेत सत्तेत सहभागी होण्याचं समर्थन केले.ते म्हणाले,२०१४ साली आमच्या वरिष्ठांनी शरद पवार (Sharad Pawar) भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला. तेव्हा आम्ही गप्प बसलो.त्यांनी घेतलेला निर्णय आम्ही मान्य केला. अशा अनेकदा घटना घडल्या आहेत. त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. त्यातूनच आम्ही ही भूमिका स्वीकारल्याचेही त्यांनी सांगितले.

...म्हणूनच सत्तेत सहभागी झालो!

राज्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी, आपली कामं होण्यासाठी, बहुजन समाज, वंचित, गरीब, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक वर्गाचं भलं होण्यासाठी आपण ही भूमिका घेतली आहे. आज ४५-५० आमदार अशी भूमिका घेतात, ही साधी गोष्ट नसल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT