Chandrashekhar Bawankule-Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : अजितदादा गेल्या सहा महिन्यांत आम्हाला कधीही भेटले नाहीत; पण... : बावनकुळेंनी टाकली ठिणगी

विश्वभूषण लिमये

सोलापूर: विरोधी पक्षनेते अजित पवार मागच्या सहा महिन्यांत आम्हाला कधीही भेटलेले नाहीत. मात्र, महाविकास आघाडीमधले काही नेते त्यांची इमेज डॅमेज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीत ठिणगी टाकली. (Ajit Pawar has not even meet us in the last six months : Chandrashekhar Bawankule)

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे आज सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवार (Ajit Paawar) यांच्याबाबत भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजप नेत्यांना भेटले आहे, ते भाजपसोबत जाणार, अशी चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण देताना महाविकास आघाडीत वाद कसे होतील, याची दक्षता घेतली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत बावनकुळे म्हणाले की, पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तर नवीन रक्ताला संधी द्यायला हवी होती. पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना संधी होती. पण, त्यांना राजीनामा द्यायचाच नव्हता, असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी शंभरपेक्षा जास्त जागा विधानसभेला निवडून आणल्या आहेत का? असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला. तसेच, येत्या २०२४ मध्ये जेव्हा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस बजेट मांडतील, तेव्हा आश्चर्यकरतरित्या कोलांटउड्या पाहायला मिळतील, असा दावाही केला.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे येत्या १७ आणि १८ मे रोजी राज्यात येणार आहेत, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली. विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला तर न्यायालयात जाण्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यावरूनही बावनकुळेंनी ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंना जिथं जायचं आहे, तिथं जावं. त्यांना आता काही कामचं उरलं नाही. विधानासभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला तरी पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा इशारा ठाकरेंनी दिला होता.

ज्या दिवशी भारत जोडो यात्रा नांदेडहून शेगावला जात होती, तेव्हा काँग्रेसचे काही लोक भाजपमध्ये प्रवेश करत होते. यावेळी मागच्यापेक्षा ही कमी जागा काँग्रेसला लोकसभेला मिळतील, असा दावाही बानकुळे यांनी सोलापुरात बोलताना केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT