Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar Kolhapur News: 'कुणीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याला पाठीशी घालणार नाही'; अजित पवारांचा गुंडांना सज्जड दम

Rahul Gadkar

Kolhapur Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुंडांना चांगलाच दम दिला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांनादेखील राजकीय दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. (Ajit Pawar Kolhapur News)

महायुतीकडून राज्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. मात्र, विरोधकांकडून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत काही गोष्ट घडत आहेत त्या मी नाकारत नाही. परंतु त्याचा तपास तिथल्या तिथे कसा होईल, या दृष्टीने महायुती सरकारचा प्रयत्न आहे. (Ajit Pawar)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'कोणीही मोठ्या बापाचा असला, कोणीही सत्ताधारी पक्षाचा असला तर त्याला पाठीशी महायुती सरकार घालणार नाही. कायदा आणि संविधान सर्वात श्रेष्ठ आहे. महायुती सरकार संविधान आणि घटनेचा आदर करूनच सर्वांना न्याय देईल. घटनेचा आणि संविधानाचा आदर करूनच महायुतीचे सरकार पुढे नेणार', असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. (Kolhapur)

ते म्हणाले, पोलिसांनी आणि पोलिस खात्याने गुण्यागोविंदाने काम करावे. राजकीय हस्तक्षेप होत असतील तर राजकीय दबावाला बळी न पडता, कोणाच्याही दादागिरी, गुंडगिरी आणि दहशतीला बळी न पडता काम करावे. समाजातील आपल्या लेकी बहिणी आणि आईला उजळ माथ्याने समाजात फिरता आलं पाहिजे. तिला सुरक्षित वाटले पाहिजे. या दृष्टीने काम करण्याच्या सूचना अजित पवारांनी पोलिस प्रशासनाला दिल्या. (Police Prashasan)

सर्वसामान्य नागरिकाला महायुतीचे सरकार माझा विचार करत नाही, अशी भावना निर्माण होता कामा नये याचीही काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातून पोलिस प्रशासनाला दिला आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT