Sangram Jagtap at Hindu Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hindu Akrosh Morcha : "महिलांच्या आडून 'जिहादी' समाज बिघडवत आहेत"; अधिवेशन सोडून संग्राम जगताप हिंदू मोर्चात, मुस्लिम समाजावर हल्लाबोल

Sangram Jagtap at Hindu Akrosh Morcha in Kolhapur : कोल्हापूर इचलकंरजी इथं हिंदू आक्रोश मोर्चात अहिल्यानगर मधील अजित पवार एनसीपी आमदार संग्राम जगताप अधिवेशन सोडून घेतलेला सहभागी चर्चेचा विषय ठरला.

Rahul Gadkar

Sangram Jagtap news : संपूर्ण महाराष्ट्रात बलिदान मास सुरू असताना इचलकरंजीमध्ये एका जिहादी महिलेने संतापजनक कृत्य केलं. आज महाराष्ट्रात अनेक गोष्टीचा त्याग करत शिवशंभुप्रेमी महिनाभर बलिदान मास पाळतात. ज्यांच्यामुळे आपण ह्या मातीत आहोत. आपण हिंदू आहोत या लोकांचा आदर म्हणून हे बलिदान मास पाळले जाते. पण हे जिहादी आता महिलांच्या आडून समाज बिघडवण्याचे काम करत आहेत, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केला.

4 दिवसापूर्वी इचलकरंजी इथं का महिलेने छत्रपती संभाजी महाराजांचे पोस्टर फाडल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आज हिंदू आक्रोश मोर्चा संघटनांच्यावतीने करण्यात आला. या मोर्चात अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून, आमदार जगताप यांचा मोर्चातील सहभाग राज्यात अन् अजित पवार राष्ट्रवादीमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

जगताप म्हणाले, सुलतान-बुलतान कोणाचं नाव घेऊ नका, त्याला मोठे करू नका, तो टिपड्या आहे. त्याने आपल्या आयाबाहिनीची अब्रू लुटली, त्याला सुलतान म्हणायचे का? बलात्कारी व्यक्तीला कोणीही सुलतानाची उपमा देऊ नये. या महाराष्ट्रात (Maharashtra) सुलतान होऊ शकत नाही. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज चालतील, असेही ते म्हणाले.

या जिहाद्यांची ट्रायल सुरू आहे. हळूहळू महाराष्ट्रात आशांची बीजे पेरली जातील, अशी कृती झाली तर गनिमी कावा करा आणि सगळं उघडून टाका. टिपड्याचा उदो उदो करण्याची गरज नाही.महाराजांच्या प्रतिमेला कोण हात लावेल त्याचा शाहिस्तेखान करा. अशा घटना घडतात त्यावेळी मनात वेदना होतात. पण पुढच्या काळात जागृत रहा छोट्या गोष्टी असल्या तरी त्याकडे लक्ष द्या, असे संग्राम जगताप यांनी सांगितले.

एक महिला जाहीरपणे येऊन बोर्ड पाडू शकत नाही, या पाठीमागे कोण तरी असायलाच हवे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचा मी जाहीर निषेध करतो. आम्ही जर मनावर घेतलं तर महाराष्ट्रातून लोक इथे येतील, असा इशाराही प्रशासनाला आमदार संग्राम जगताप यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT