Kolapur News, 09 Apr : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादीला महायुतीची ताकद मिळाली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील असलेल्या राष्ट्रवादीपुढे अडचणीचा डोंगर उभा राहिला.
कोल्हापूर जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जात होते. पण आता राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण? हेच शोधण्याची वेळ आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वात मोठी कसोटी ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची असणार आहे.
नेतृत्वाची कमतरता, समन्वयाचा अभाव, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांची पुन्हा घरवापसी होण्याची शक्यता असल्याने आगामी स्थानिकच्या निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांना देखील कसरत करावी लागणार आहे. नेतृत्वाची कमतरता असल्यानेच लोकसभेला जागा गमवावी लागली. पक्षाकडे खमक्या नसल्याचा विधानसभा निवडणुकीत फटका बसला.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या खांद्यावरच हात ठेवून चालावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला दिली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारी घरोघरी पोहोचवण्यात अडचण आली. अशातच राष्ट्रवादीकडे खमके नेतृत्व नसल्याने विधानसभा निवडणुकीत देखील काही मोजक्याच जागांवर लढावे लागले.
कागल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे हे राष्ट्रवादीत आले. मात्र, निवडणुकीनंतर राष्ट्रवादीसाठी त्यांची योगदान काय? अशी विचारण्याची वेळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. मागील आठवड्यात झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षाच्या संघटनापेक्षा दोन राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चेनेच कार्यकर्ते चिंतेत पडले आहेत.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर सातत्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील हे सातत्याने तुटून पडले आहेत. शहराध्यक्ष आर. के. पवार हे देखील मंत्री मुश्रीफ यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे आता भविष्यात दोन पक्ष एकत्र आले तर उरलेसुरले स्वतःचे अस्तित्व देखील धोक्यात येईल अशी भीती राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आहे.
दुसरीकडे भाजपमधून (BJP) आलेले घाटगे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या दोन ते तीन दौऱ्यानंतर आज देखील चार्ज आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर पराभव पत्करलेल्या कार्यकर्त्यांच आत्मविश्वास वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून अद्याप कोणताच कार्यक्रम झालेला नाही.
त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचे संघटन, मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रवादीला प्रयत्न करावे लागणार आहेत. शिवाय नेतृत्वाचा शोध घ्यावा लागणार आहे. अन्यथा विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच चालावे लागणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.