Ajit Pawar,Shashikant Shinde
Ajit Pawar,Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शशिकांत शिंदेंच्या पराभवावर अजित पवारांचे भाष्य...

सरकारनामा ब्यूरो

रायगड : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीत (Satar District Bank election) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) याचा पराभव झाला. त्यांच्या पराभवानंतर शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

अजित पवार रायगडमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीसंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी ताबडतोब साताऱ्याच्या एसपींसी बोललो आहे. एसपींनी मला सांगितले की दादा पाच सहा लोक होते. त्यांना आम्ही ताब्यात घेतले. ते कोण होते त्याची चौकशी पोलिस करत आहेत. कोणत्याही निवडणुकीत यश अपयश असते. सगळेच निवडणून येतात असे नाही. सहकार क्षेत्रातील निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. साताऱ्यात जे पॅनल झाले होते त्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक होते. त्यात अनेक आमदार, खासदार होते. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढवली जात नाही. संस्था चांगली चालावी आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी त्या भावनेतून ती बॅंक चाललेली आहे. दोन्हीकडील उमेदवार हे पक्षाचे असले तरी निवडणुकीत जय पराजय हा होतच असतो, असे पवार म्हणाले.

दरम्यान, जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून त्यांचे विरोधक ज्ञानदेव रांजणे यांना २५ तर शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली. त्यामुळे शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. यानंतर शशिकांत शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब माझे नेते आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेला पराभव आपण स्वीकारला असून माझ्या विजयासाठी प्रयत्न करणारे माझे नेते व कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभार मानतो.

निवडणूक म्हटले की जय पराजय हा आलाच मात्र ही निवडणूक मी लोकशाही मूल्यांवर लढवली याचा मला अभिमान आहे. कटकारस्थाने झाली नसती तर नक्कीच आज निकाल वेगळा दिसला असता. या पराभवाने कुणीही खचून न जाता सर्व कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा. येणाऱ्या काळात अधिक जोमाने काम करून विजयश्री खेचून आणू हा विश्वास मला आहे. कुणीही संयम ढळू न देता पक्षाबद्दल शाब्दिक किंवा कृत्यातून विरोध दर्शवण्याचा प्रयत्न करू नये. माझे सर्व कार्यकर्त्यांवर प्रेम असले तरी पक्ष विरोधी कृत्य खपवून घेतले जाणार नाही. आपण सर्व माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद, असे शशिकांत शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT