Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अजित पवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्ग निघू शकतो; पण...

सरकारनामा ब्यूरो

अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST strike) सुरु आहे. त्यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी लावून धरली आहे. मुंबईमध्ये आझाद मैदानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत (Sadabhaut Khot) यांच्या नेतृत्त्वात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी संपावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यरोपांच्या फैरी झडत आहेत. या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर टीका केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या पिंपळनेर गावातील संत निळोबा राय अभंग गाथा प्रकाशन सोहोळा उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. या वेळी भाषणात बोलताना एसटी महामंडळच्या सुरू असलेल्या संपाबाबत पवार म्हणाले, चर्चेतून मार्ग, चर्चेतून प्रश्न सुटू शकतात. मात्र, यामध्ये काही नेते भावना भडकवण्याच काम करत आहे. मला एकाच प्रश्न विचारायचा आहे.

इथे विलीनीकरण करा असे आंदोलन करताहेत. आणि देशातील एअर इंडिया कंपनीच खाजगी केले गेले तिथे काहीच कुणाचे ऐकले नाही. त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. कुठ तरी थांबल पाहिजे. दोन पावले सरकारने मागे जायचे असते दोन पावले मागणी करणाऱ्यांनी मागे जायचे असते त्यातून मार्ग काढायचे असतात, असेही पवार म्हणाले. या कार्यक्रमासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

दरम्यान, आमचे सरकार होते तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे झाले विलीनीकर, असे सांगत माजी मंत्री रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. रस्त्यावर असताना एक बोलायचे आणि आत गेल्यावर एक असते, त्यामुळे हा सिस्टीमचा भाग आहे. त्यामुळे जनतेने हुशार झाले पाहिजे, हाच एक त्यावरचा पर्याय आहे, असेही जाणकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT