Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : 'निवडणुकीनंतर कळेल कोणाची शिवसेना खरी'

मढेवडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या हस्ते झाले.

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar : श्रीगोंदे तालुक्यातील मढेवडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या हस्ते झाले. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत सुरू असलेल्या वादावर भाष्य केले.

राज्यपालांकडून नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती बाबत अजित पवार म्हणाले, मागे लोकशाही पद्धतीने आलेल्या सरकारने कॅबिनेटचा ठराव करून 12 आमदारांची नावे दिली होती. आम्ही तत्कालीन सरकारतर्फे राज्यपालांना अनेकवेळा भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी ते काही कारणे द्याचे मात्र त्यावेळी काही झाले नाही. राज्यपालांचा अधिकार मोठा आहे. जनतेने ठरवायचे हे लोकशाही पद्धतीने सुरू आहे का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शिवसेनेतील दोन्ही गटांकडून दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरू आहे, याबाबत त्यांनी सांगितले की, दोघांनाही मागणी करण्याचा अधिकार आहे. मात्र वर्षानुवर्षे महाराष्ट्रातील जनता पाहत होती की, शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. त्यांनी शेवटच्या सभेत सांगितले होते की, या पुढे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचा कारभार पाहतील. शिवसेना त्यांच्या नेतृत्त्वाखाली चालेल असे सांगितले होते. मात्र मागील 20 जून पासून राज्यातील राजकीय घडामोडी सर्वांनी पाहिल्या आहेत.

ज्याच्या हाती पावर असते ते त्यांना हव्या त्या पद्धतीने गोष्टी करतात. यातून पहिल्यांदा कोणाचा तरी कार्यक्रम होईल आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. शेवटी वाद घालून चालणार नाही. शेवटी सर्वसामान्य जनता कोणाच्या पाठीशी आहे ते शिवाजीपार्कच्या सभेनंतरच लक्षात येईल. निवडणुकीनंतर कळेल कोणाची शिवसेना खरी, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पूर्वी वर्षानुवर्षे गणेशोत्सव चालू आहेत. मात्र मागील काळात कधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणी कॅमेरा बरोबर घेऊन दर्शनाला जात नव्हते. जो गणेश भक्त आहे, त्याने देखावा दाखविण्याची अवश्यकता नाही. काहींना शो करण्याची सवय लागली त्याला काय करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT