Umesh Patil Meet Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अजितदादांच्या निकटवर्तीय नेत्याने घेतली भाजपच्या विखे पाटलांची भेट

विखे पाटील यांची पाटील यांनी घेतलेली भेट‌ पत्नीच्या कामासाठी होती की राजकीय, याची चर्चा आता रंगली आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी आज (ता. २३ डिसेंबर) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यालयात हजेरी लावली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना भेटण्यासाठी उमेश पाटील हे भाजप कार्यालयात गेल्याचे सांगण्यात आले. एरवी भाजपवर तुटून पडणारे उमेश पाटील यांनी भाजप नेत्याची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. (Ajit Pawar's close NCP's leader meet BJP's Vikhe Patil)

उमेश पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आहेत. मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते सोलापूर जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. सोलापूरमधील अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून उमेश पाटील यांची ओळख आहे. दरम्यान, त्यांनी आज भाजप कार्यालयात जाऊन विखे पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडेही दिसत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांची पत्नी पुण्यात प्रशासकीय सेवेत आहे. त्यांच्या पत्नीचं काही दिवसांपूर्वी तहसीलदारपदावरून निलंबन झालं आहे. त्या पुणे जिल्ह्यातील हवेलीच्या तहसीलदार होत्या. त्या ठिकाणी असतानाच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्याचा काही संदर्भ या भेटीमागे आहे का, याची कुजबूज होताना दिसत आहे.

एकंदरीतच, राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या उमेश पाटील यांचे भाजप कार्यालयात जाणे चर्चेचा विषय ठरले आहे. पाटील हे अजितदादांच्या खास जवळचे मानले जातात. भाजाप कार्यालयात जाऊन त्यांनी विखे पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विखे पाटील यांची पाटील यांनी घेतलेली भेट‌ पत्नीच्या कामासाठी होती की राजकीय, याची चर्चा आता रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT