Srinivas Shinde, Ajit Pawar, Amit Kadam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara NCP News : अजित पवारांचे निष्ठावंत अमित कदमांवर दिली महत्त्वपूर्ण जबाबदारी...

Umesh Bambare-Patil

Satara NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी अमित कदम यांची, तर जिल्हा सरचिटणीसपदी श्रीनिवास शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या NCP Satara पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच साताऱ्यात जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे अधिकार रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar, आमदार मकरंद पाटील Makrand Patil, दीपक चव्हाण, संजीवराजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याबाबतचा ठराव झाला.

पक्षाची कार्यकारिणी सक्षम व भक्कम करण्याकरिता रामराजे नाईक निंबाळकर, मकरंद पाटील यांनी कार्याध्यक्षपदी अमित गेणूजी कदम (जावली) व जिल्हा सरचिटणीसपदी श्रीनिवास शिंदे (वाई) यांची नियुक्ती केली. Maharashtra Political News

अमित कदम हे अजितदादा यांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच जिल्ह्याच्या संघटनात्मक समन्वय साधण्यासाठी श्रीनिवास शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. शिंदे हे मकरंद पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT