Shashikant Shinde, Sanjay Raut sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara NCP News : मित्र पक्षांनी शरद पवारांबाबत जपून वक्तव्ये करावीत : शशिकांत शिंदेंचा राऊतांना इशारा

Sanjay Raut News: शिवसेनेचे खासदार संजय राऊत तसेच मित्रपक्ष काँग्रेसचे काही सदस्य वारंवार शरद पवार यांच्या संदर्भात वक्तव्ये करून लोकांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Umesh Bambare-Patil

Satara Political News : खासदार शरद पवार यांच्या भूमिकेविषयी मित्र पक्षांनी बोलू नये. त्यांनी एकदा नव्हे दोनदा नव्हे वारंवार भाजपच्या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत तसेच काँग्रेस सारख्या मित्र पक्षांनी या संदर्भात वारंवार विधाने करून लोकांच्या संभ्रम निर्माण करू नये, जपून वक्तव्ये करावीत, अशी अपेक्षा आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

सातारमध्ये शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. शरद पवारांच्या Sharad Pawar भूमिकेसंदर्भात वारंवार जी चर्चा घडत आहे, त्या संदर्भात त्यांना डिवचले असतात ते म्हणाले, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच त्यांनी भाजपसोबत जवळी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

याबाबत त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा सांगितले आहे. तरीसुद्धा शिवसेनेचे खासदार संजय राऊत तसेच मित्रपक्ष काँग्रेसचे काही सदस्य वारंवार या संदर्भात वक्तव्य करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकशाहीमध्ये सर्वांना भाषण स्वातंत्र्य आहे. मात्र, शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असतानाही वारंवार त्या विषयावर बोलणे हे योग्य नाही. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असतानाही वारंवार त्या विषयावर बोलणे हे योग्य नाही. त्यांनी अशी मतप्रदर्शने करू नयेत, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.

ननावरे दांपत्याच्या आत्महत्येप्रकरणांत मुंबई आणि सातारा येथील दोन लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे. या संदर्भात शशिकांत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे. तपासाचा भाग असल्यामुळे थेट यावर मी भाष्य करू शकत नाही. याविषयीची कोणती अधिक माहिती माझ्याकडे नाही. मात्र, पोलीस तपासात जे काय आहे, ते सत्य उघडकीस येणारच आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT