Amit Shah at Kolhapur : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्रीय नेतृत्वापर्यंत आपली छबी निर्माण करण्यासाठी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना कोल्हापूर दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले होते. त्या अनुषंगाने पुढील आठवड्यात अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. आज त्यांचा दौरा निश्चित होणार असून मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी ते कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह (Amit Shah) कोल्हापुरात येणार असल्याने महायुती मधील नेत्यांनी मेळाव्याचे नियोजन केले आहे. त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांना कोल्हापुरात आणण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू ठेवले होते. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि शेंडा पार्क येथील अत्याधुनिक शासकीय रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला शाह यांना आणण्याची तयारी ठेवली होती. त्यासाठी अमित शाह हे 24 सप्टेंबर किंवा 28 सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. 23 सप्टेंबर रोजी ते नागपूर दौऱ्यावर आहेत. तर 24 सप्टेंबर रोजी ते कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बदल झाल्यास 28 सप्टेंबर रोजी ते कोल्हापुरात असणार आहेत.
शिवाय या कार्यक्रमासह आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्त्यांचा मेळावा देखील कोल्हापुरात होणार आहे. कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल किंवा नागळा पार्क येथील भाजप कार्यालय परिसरात हा मेळावा होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना कोल्हापुरात आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवले होते. शाह दौऱ्यावर आल्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ हे शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांची उद्घाटन देखील होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.