पुणे : ‘अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे’, अशा शब्दात भाजपचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांच्यावर टीकास्त्र डागले होते. त्याला मिटकरींनी एक व्हिडिओ शेअर करीत प्रत्युत्तर दिलं आहे. मिटकरी आणि खोत यांचे शाब्दीक युद्ध रंगले आहे.
इस्लामपुरच्या सभेत अमोल मिटकरी यांनी भाषणात एक किस्सा सांगितला होता. 'मी एका लग्नात गेलो होतो. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झालेली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते,'मम भार्या समर्पयामी'. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं. अरे येड्या ते महाराज म्हणतायत, मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा, आरारारा..कधी सुधारणार,' असं मिटकरी यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.
अमोल मिटकरींच्या या विधानावर ब्राम्हण समाज आक्रमक झाला असून मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मिटकरींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.यावरुन सदाभाऊ खोत यांनी मिटकरींनी डिवचलं होतं.
“अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. तोडा फोडा अशी नीती राष्ट्रवादीची आहे.प्रत्येक समाजाची नेते पक्षात घ्यायची, जातीयवाद करायचा आणि पवार साहेब आपले तारणहार आहेत. हे समाजाला समजावण्याचे काम राष्ट्रवादीमधील नेते करतात,” अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली होती.
मिटकरी यांनी टि्वटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत खोतांना प्रत्युत्तर दिले आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती 'भाजपच्या गौळणीने दुसऱ्यांना नाच्या म्हणणं शोभत नाय,' असे विधान करताना दाखवण्यात आला आहे. तो व्हिडिओ शेअर करीत ‘लायकीच दाखवली काकांनी तर..’ असे कॅप्शन देत अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोतांना उत्तर दिलं आहे.
'सदाभाऊ स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेतात मात्र मी त्यांच्यावर टीका करण्याइतका मोठा नाही. पण सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतूनं हाती घेतलेल्या माणसासारखी झाले आहे का? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जसा पिंजरा चित्रपटात ज्या गुरुजींनी तमाशाला विरोध केला आणि शेवटी त्यांनाच नाचावे लागलं तशी परिस्थिती सदाभाऊंची झाली आहे,'असं व्यक्तव्य मिटकरींनी एका कार्यक्रमात केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.