Amol Mitkari 

 
पश्चिम महाराष्ट्र

अमोल मिटकरी, शरद पवारांचे हेलिकॉप्टर आणि चंद्रकांत पाटील

सोलापूरात आयोजित एका कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे.

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : ''आज विधानपरिषदेवर जे दोन आमदार निवडून आले आहेत त्यांनी कोट्यवधी पैसे खर्च केले आहेत,मला विधानपरिषदेवर येण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागला नाही,'' असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. सोलापूरात आयोजित एका जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.

नागपूर आणि अकोला विधान परिषदेच्या निवडणूकांचा काल निकाल लागला. यात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल विजयी झाले. यानंतर सोलापूरात एका कार्यक्रमात बोलताना पुन्हा भाजपच्या विजयावर भाष्य केलं आहे.

''नागपूर आणि अकोला येथे विधानपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी झाली. यामध्ये जे भाजपचे दोन उमेदवार निवडून आले आहेत ते कोट्यवधी रुपये खर्चून निवडून आले आहेत. मात्र, मला विधानपरिषदेवर येण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागला नाही. पवार साहेबांनी 55 लोकांच्या यादीमधून मला निवडलं. त्यातही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये मला येऊ दिलं नाही. कारण राज्यपालाने माझा इतिहास वाचला तर राज्यपाल मला पुढे येऊ देणार नाही. असं ही राज्यपालांकडे 12 सदस्य वेटिंगवर आहेत.''

त्याचवेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही खिल्ली उडवली आहे. ''चंद्रकांत पाटील तुम्ही जेंव्हा चड्डीचा नाडा बांधायचा तेंव्हा घरावरून जे हेलिकॉप्टर जायचं त्यात शरद पवार बसलेले असायचे. अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. तसेच, "ज्यांची औकात आणि लायकी नाही अशी भाजपाची लोक शरद पवारांवर टीका करतायत, चंद्रकांत पाटील हे जेंव्हा चड्डीचा नाडा बांधायचे तेंव्हा घरावरून जे विमान जायचं त्यात शरद पवार बसलेले असायचे हे विसरू नका. त्यामुळे एवढी मागरुरी आणि मस्ती भाजपावाल्यांना का आलीय याचा जाब विचारावा लागेल." असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT