Amol Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Result : अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे विजयी; नाना काळे, बरडेंच्या कन्येचा पराभव

Corporation Election Result 2026 : सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेनेने वर्चस्व राखत तीन जागा जिंकल्या असून भाजपला केवळ एक जागा मिळाली. अमोल शिंदेंनी वरिष्ठ भाजप नेत्यांवर थेट हल्ला केल्याने हा प्रभाग विशेष चर्चेत होता.

Vijaykumar Dudhale

Solapur, 16 January : सोलापूर : संपूर्ण सोलापूर शहराला उत्सुकता लागलेल्या प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अनिकेत पिसे आणि मनोरमा सपाटे हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत, तर भाजपच्या एक उमेदवार विजयी झाल्या आहेत. अमोल शिंदे यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांना अंगावर घेतले होते, त्यामुळे या प्रभागाची उत्सुकता होती.

प्रभाग क्रमांक सातमधील लढतीकडे संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष लागले होते. या प्रभागातून शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली होती. या प्रभागातील शिवसेनेचे अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे हे तर भाजपच्या श्रद्धा पवार ह्या विजयी झाल्या आहेत.

सोलापूर शहरातील २४ प्रभागांपैकी मोजकेच प्रभागातील मतमोजणी शिल्लक राहिली होती. त्यात प्रभाग सात आणि पंधराचा समावेश होता. या दोन्ही प्रभागात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे या उमेदवारांचा समावेश होता. तसेच पंधरामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले विनोद भोसले या बहुचर्चित उमेदवारांचा समावेश आहे, त्यामुळे संपूर्ण शहराचे या प्रभागाकडे लक्ष लागले होते

प्रभाग क्रमांक सातमध्ये पहिल्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच एक असे चारही उमेदवार आघाडीवर होते. मात्र, दुसऱ्या फेरीत भाजप श्रद्धा पवार आघाडीवर आल्या आहेत. पुढच्या फेरीत शिवसेनेचे अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे आघाडीवर आहेत, भाजपच्या श्रद्धा पवार ह्या विजयी झाल्या आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुरुषोत्तम बरडे यांच्या कन्या उत्तरा बरडे, माजी उपमहापौर नाना काळे, आनंद कोलारकर यांचा पराभव झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT