Koyana Dam
Koyana Dam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गुड न्यूज : वीज निर्मितीसाठी कोयनेतील अतिरिक्त पाच टीएमसी पाणी मिळणार...

विजय लाड

कोयनानगर : पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी कोयना धरणातून दिलेले 10 टीएमसी अतिरिक्त पाणी 15 मे पर्यंत संपत असल्याने ऐन उन्हाळ्यात राज्यातील जनतेला कडक उन्हासह वीज टंचाई जाणवू नये, यासाठी धरणातील पाच टीएमसी अतिरिक्त पाणी वीज प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे, अशी माहिती कोयना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांनी दिली आहे.

मागील वर्षी कोयना जलविद्युत प्रकल्पातून तीन हजार 930 मेगावॅट वीजनिर्मिती झाली होती असे सांगून श्री. डोईफोडे म्हणाले, त्यातून महानिर्मिती कंपनीला 500 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. वीजनिर्मितीसाठी यंदा प्रथमच कोयना धरणातून 82 टीएमसी पाणीसाठा मिळणार आहे. पश्चिमेकडील वीजप्रकल्पासाठी लवादाने आरक्षित केलेला कोठा 22 एप्रिलला पूर्ण क्षमतेने वापर केल्यामुळे संपला आहे.

कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती होत असल्याने भारनियमनाचा भार कमी आहे. त्यासोबत पश्चिमेकडील वीज प्रकल्प विनाखंडीत सुरू राहावा, यासाठी कोयना धरणातून 10 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा पश्चिमेकडील वीजप्रकल्पाला देण्यात आला होता. धरणातून पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी पाणीसाठा वाढवून दिल्याने प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प क्षमतेने सुरू आहे. अतिरिक्त पाणीसाठा वाढविल्याने 336 दिवसांत विज निर्मिती होणार आहे.

धरणाचे तांत्रिक वर्ष संपायला 29 दिवस आहेत. पश्चिमेकडील वीज प्रकल्प पूर्णक्षमतेने चालवल्याने वाढवून दिलेला पाणीसाठा 15 मेपर्यंत संपत आहे. तो पाच टीएमसी वाढवून देण्याचा मागणी केली होती. त्याला मान्यता मिळाली आहे. धरणात सध्या 37.46 टीएमसी पाणीसाठा आहे. महानिर्मिती कंपनीने पाणी साठा वाढवून देण्याची केलेली मागणी जलसंपदा विभागाने मान्य केली आहे. धरणातून 15 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा पश्चिमेकडील वीजप्रकल्पासाठी देण्यात आला आहे. 31 मे ला तांत्रिक वर्षपुर्ती होणार आहे. यावर्षी धरणातून 82 टीएमसी पाणीसाठयाचा वापर वीजनिर्मितीसाठी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT