Dattatray Lohar
Dattatray Lohar 
पश्चिम महाराष्ट्र

आनंद महिंद्रांनी दत्तात्रयला लोहारांना दिली बोलोरो गिफ्ट... 

सरकारनामा ब्युरो

सांगली : सांगलीच्या (Sangali) देवराष्ट्रे येथील दत्तात्रय विलास लोहार (Dattatray Lohar) यांचा महिनाभरापूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. दत्तात्रय लोहार यांनी मुलाचा हट्टापायी जुगाड करत त्यांच्या कल्पकतेने बनवलेल्या मिनी जिप्सीचा हा व्हिडीओ होता. या व्हिडीओनंतर दत्तात्रय लोहार चांगलेच चर्चेत आले होते. लोहार यांचा हा देसी जुगाड पाहून देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंंद महिंद्रा यांनी लोहार यांना ही देसी जुगाडने बनवलेली ही जीप इतकी आवडली की त्यांनी ही जीप मागितली. पण लोहार यांनी आपली जीप आनंद महिंद्रांना (Anand Mahindra ) देण्यास साफ नकारही दिला होता.

मात्र आनंद महिंद्रांना लोहार यांना बलेरो कार देणार असल्याचे ट्विट केले होते. त्या ट्विटनंतर आज अखेर दत्तात्रय लोहार यांना आज महिंद्रा कंपनीने बोलेरो कार सुपूर्त केली. तर त्याबदल्यात दत्तात्रय लोहार यांनी त्यांची मिनी जिप्सी महिंद्रा कंपनीला सुपूर्त केली. बोलेरो गाडी दत्तात्रय यांच्याकडे सुपूर्त करताना माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम याठिकाणी उपस्थित होते.

दत्तात्रय लोहार यांनी मुलाच्या हट्टा पायी जुगाड करत त्यांच्या कल्पकतेने बनवलेल्या मिनी जिप्सीमुळे देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांची देशभरात ओळख झाली. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी चक्क बोलेरो देतो असे ट्विट केले होत आहे. दत्तात्रय लोहार यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही मिनी जिप्सी बनवली होती. आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या दत्तात्रय यांनी गाडी तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतातील ऊस विकून गाडीचे साहित्य आणले होते. कुटुंबातील सर्वांची साथ मोलाची लाभली. दत्तात्रय लोहार याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.

अशी आहे दत्तात्रय लोहार यांची किकस्टार्ट मिनी जिप्सी

दत्तात्रय लोहार यांचे स्वतःचे फॅब्रिकेशन वर्कशॉप आहे. ते फारसे शिक्षणही फारसे शिकलेले नाहीत. मात्र अल्पशिक्षित असूनही त्यांनी दुचाकीचे इंजिन, चारचाकीचे बोनेट आणि ऑटो रिक्षाची चाके वापरून ६० हजार रुपये खर्चून ही जीप तयार केली आहे.ही जीप दुचाकीप्रमाणे किक मारून सुरू होते. एक लिटर पेट्रोलमध्ये 40 ते 45 किलोमीटर अंतर कापते. अनेक जण त्यांना अशा जीप बनवण्याची ऑर्डर देत आहेत. दत्तात्रय लोहार यांनी बनवलेल्या जीपचा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे.

या जुगाड जीपबद्दल आनंद महिंद्रा म्हणाले...

आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रय लोहार यांच्या बुद्धिमत्तेचे आणि कौशल्याचे कौतुक केले. या जुगाड जीपबद्दल आनंद महिंद्रा म्हणाले की, 'हे वाहन नियमात बसत नाही. पण कार बनवण्याच्या त्यांच्या कल्पनेचे आणि कमी संसाधनांमध्ये एवढी मोठी गोष्ट बनवण्याच्या त्यांच्या क्षमतेचे कौतुक करण्यापासून मी स्वतःला थांबवणार नाही.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना दत्तात्रय लोहार म्हणाले की, बोलेरो वाहन वापरण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. त्यांची पत्नी राणी लोहार म्हणाल्याकी, 'आनंद महिंद्रा त्यांना नवीन कार देत आहे. पण त्या बदल्यात त्यांना आमची गाडी हवी आहे. आम्ही ते अत्यंत काळजीपूर्वक तयार केले आहे. 2 वर्षांपासून यासाठी साहित्य गोळा करत आहे. गेल्या 5-6 महिन्यांपासून या वाहनाचा वापर सुरू केला आहे. या गाडीमुळे आमची खूप बचत झाली. ही पहिली लक्ष्मी आहे. म्हणूनच आम्ही ते देऊ इच्छित नाही. हे वाहन तयार झाल्यानंतर आमचे काम पूर्वीपेक्षा चांगले सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT