NCP (Sharad Pawar faction) leader Anandrao Nalawade after being elected unopposed as Chairman of Sangli Agricultural Produce Market Committee Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli APMC : ZP निवडणुकीत काँग्रेसचे नाक दाबलं; आता बाजार समितीच्या सभापतीपदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

Anandrao Nalawade News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आनंदराव नलवडे बिनविरोध निवडले गेले. शेतकऱ्यांसाठी सुविधा वाढवण्याबरोबर सावळी येथे बेदाणा मार्केट उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Rahul Gadkar

Sangli APMC Chairman : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसची सत्ता असल्याने अडीच अडीच वर्ष सभापतीपद वाटून घेण्याचे ठरले असताना काँग्रेसकडू सुजय शिंदे यांनी पावणेतीन वर्ष सभापती पद भोगले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आनंदराव नलवडे यांच्या चिरंजीवाने काँग्रेसच्या विरोधात कसबे डिग्रज त्या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

या प्रकारामुळे काँग्रेसचे नाक दाबल्याने बाजार समिती मध्ये सभापती सुजय शिंदे यांचा खासदार विशाल पाटील यांनी राजीनामा घेतला. त्याचवेळी सभापती पदाची चर्चा ठरल्याने नलवडे यांच्या चिरंजीवांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.

दरम्यान जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर सभापती निवड करण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती. पहिल्या सभापतीपदी काँग्रेसकडून सुजय शिंदे यांना संधी मिळाली. यावेळी सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे आनंदराव नलवडे व महेश पवार यांची नावे आघाडीवर होती. कवठेमहांकाळ तालुक्यातील महेश पवार यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती.

जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी कवठेमहांकाळला संधी द्यावी, अशी भूमिका घेतली होती. अखेर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आनंदराव नलवडे यांची गुरुवारी (ता. 5) बिनविरोध निवड झाली. सभापती निवडीसाठी नलवडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली. मिरजेचे सहकार उपनिबंधक बिपीन मोहिते यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, देवराज पाटील व माजी आमदार विक्रम सावंत यांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करू. बाजार समितीच्या विभाजनाबाबत कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दावा सुरू असून विभाजन होऊ नये ही आमची भूमिका आहे. जत व कवठेमहांकळ येथील उपबाजार समित्या सक्षम करण्यावर भर देऊ. तसेच सावळी येथे सुसज्ज बेदाणा मार्केट उभारण्याचा प्रयत्न करू. बाजार समितीच्या सुविधांसाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करु.अशी प्रतिक्रिया आनंदराव नलवडे यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT