anna hazare
anna hazare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अण्णा हजारे यांच्या दबावतंत्राला आले यश

मार्तंड बुचुडे

पारनेर ( अहमदनगर ) : सामान्य नागरिकांना अधिकारी ते थेट मुख्यमंत्र्यांविरोधात भष्टाचाराची तक्रार करता यावी या हेतूने राज्यात लोकायुक्त कायदा अस्तित्वात यावे यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. Anna Hazare's pressure system succeeds

या आंदोलनाच्या दबावतंत्रामुळे राज्यात एक आदर्श असा लोकायुक्ताचा कायदा तयार होत आहे. त्यासाठी नेमलेल्या मसुदा समितीची काल (ता. 8 ) पुणे येथे आठवी बैठक झाली. या वेळी बैठकीत अनेक मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली. लवकरच या मसुद्यास अंतिम स्वरूप मिळणार आहे.

देशात लोकपालचा कायदा लागू झाला आहे त्याच धरतीवर राज्यात लोकायुक्त कायदा असावा असी मागणी हजारे यांनी केली होती त्या साठी हजारे यांनी 30 जानेवारी 2019 ला उपोषण सात दिवसांचे उपोषण केले होते. त्या वेळी तत्कालीन सराकारने लोकायुक्त कायदा करण्याचे अश्वासन दिल्या नंतर व तो कायदा करण्यासाठी 10 सदस्यांची मसुदा समिती गठीत करण्याचे ठरले होते. त्यात पाच सदस्य हजारे यांच्या वतीने व पाच सदस्य राज्यसरकारचे आहे.

यात हजारे यांच्यासह उमेशचंद्र सरंगी, डॉ. विश्वंभर चौधरी ,अॅड. शाम असावा व संजय पठाडे यांचा समावेश असून सराकरच्या वतीने राज्याचे प्रधान सचिव हे या समितीचे अद्यक्ष आहेत . आज प्रधान सचिव सिताराम कुंठे यांच्यासह न्यास व विधी विभाग, गृह विभाग, अर्थ व सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव या समितीत आहेत.

या समितीच्या अत्तापर्यंत आठ बैठका झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पाच व उद्धव ठाकरे सरकाच्या काळात तीन अशा आठ बैठका झाल्या आहे. या कायद्याचा मुसुदा अंतीम टप्यात आला आहे. काल झालेल्या बैठकीत हजारे यांनी अनेक मुद्दे मांडले त्यावर कायद्याच्या कसोटीवर तपासून व चौकटीत बसतील त्या मुद्यांचा कायद्यात समावेश केला जाईल असे ठरले.

भ्रष्टाचाराच्या विरोधी लढाईतील माहितीचा अधिकार हे पहिले तर लोकपाल व लोकायुक्त हे दुसरे पाऊल आहे. या पुर्वी देशातील पाच राज्यात लोकायुक्ताचा कायद झाला आहे.परंन्तू महाराष्ट्रातील लोकायुक्त कायदा अधिक सक्षम व्हावा.

- अण्णा हजारे, जेष्ठ समाजसेवक.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT