Ahmednagar Politics: मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जयहिंद लोकचवळीच्या माध्यमातून शेतकरी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या राज्यभरातील युवा शेतकऱ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. (State Level Youth Farmer Award and Gathering)
या पुरस्कारासाठी कृषी क्षेत्रातील तसेच कृषी पूरक व्यवसाय (शेळीपालन ,कुक्कुटपालन गोपालन , कृषी प्रक्रिया क्षेत्र व इतर कृषी अंगीकृत व्यवसाय) यामध्ये उत्कृष्ट नियोजन करून दिशादर्शक प्रकल्प केलेल्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. (Ahmednagar Politics)
देशात आजही सुमारे 55 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असते. निसर्गाची अनियमितता, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असे सतत चाललेले दृष्टचक्र व काही चुकीची कृषिधोरणे, विशेषतः निर्यातीचे धोरण (भावाची कधीही शाश्वती नसणे) अशा विविध संकटाना शेतकरी सतत तोंड देत असतो. तसेच, घटती उत्पादकता व वाढता उत्पादन खर्च यामुळे देखील शेतीचे अर्थकारण सातत्याने बिघडत चाललेले आहे. तथापि कृषी क्षेत्रात काही ठोस उपाययोजना केल्यास शेती आपले बलस्थान होऊ शकते असे मत आमदार सत्यजीत तांबे(Satyajit Tambe) यांनी व्यक्त केले.
राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासह सुदृढ ग्राम, क्रीडा, आरोग्य, उद्योग व स्वयंरोजगार, वाचनचळवळ यांसारख्या अन्य 15 क्षेत्रात देखील कार्य करत आहेत, आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, सुदृढ समाजाच्या निर्मितीचे आपण भागीदार बनले पाहिजे या भावनेने बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व डॉ.सुधीर तांबे यांनी 22 वर्षांपूर्वी जयहिंद लोकचळवळची स्थापना केली.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.