carapstion
carapstion Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अहमदनगर महापालिकेतील आणखी एक अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत गेल्याच वर्षी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले होते. त्यांना अटकही झाली. ते सध्या निलंबित आहेत. शहरातील पथदिवे घोटाळा तर राज्यभर गाजला. अशातच अहमदनगर महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर यांना लाचलुचपत विभागाने आज अटक केली. Another Ahmednagar Municipal Corporation official caught red-handed

अहमदनगर महापालिकेतील मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर यांनी ठेकेदाराकडून बीलाचा धनादेश काढण्यासाठी 20 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

महापालिकेने यातील तक्रारदार व त्यांचे मावसभाऊ यांना ठेकेदार म्हणून विकासकामे करण्यास दिली होती. ही कामे पूर्ण झाली. या केलेल्या कामाची बिले मंजूर करुन धनादेश देण्याच्या मोबदल्यात आरोपी मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर (वय 52, रा. दिल्ली गेट, मानकर गल्ली, अहमदनगर. हल्ली मुक्काम- उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी, पुणे - 6) यांनी संबंधित ठेकेदाराकडे 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार आहे.

तक्रारदार ठेकेदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे 7 ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून त्याच दिवशी केलेल्या लाच मागणी पडताळणामध्ये प्रवीण मानकर यांनी तक्रारदार यांचेकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. त्याच दिवशी 15 हजार रुपये स्वीकारण्याची संमती दर्शवली. त्यामुळे आज (बुधवारी) त्यांना ताब्यात घेवून त्याच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे, प्रशांत सपकाळे, हवालदार संतोष शिंदे, पोलिस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हारुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या पूर्वीही झाल्या कारवाया

स्थापनेपासून महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख, पाणी पुरवठा विभाग प्रमुख, महापौरांचे स्वैयसहाय्यक, दोन लिपीक लाचलुचपच्या जाळ्यात अडकले आहे. पथदिवे घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT