<div class="paragraphs"><p>Anuradha Adik</p></div>

Anuradha Adik

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

अशोक साखर कारखान्याच्या निवडणुकीत अनुराधा आदिकांची एन्ट्री

सरकारनामा ब्युरो

बापूसाहेब कोकणे

टाकळीभान ( जि. अहमदनगर ) : श्रीरामपूर तालुक्यातील अशोक नगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे व जिल्हा सरकारी बँकेचे संचालक करण ससाणे यांनी जनता सेवा पॅनल काढला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांची कन्या अनुराधा आदिक यांनीही या निवडणुकीच्या प्रक्रियेत एन्ट्री केल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. Anuradha Adik's entry in the election of Ashok Sugar Factory

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी खासदार (स्व.) गोविंदराव आदिक यांच्या कन्या व साईसंस्थानच्या सदस्या अनुराधा आदिक यांनी पुढाकार घेतला आहे. निवडणुकीत आदिक कुटुंबातील सदस्याने एन्ट्री केल्याने ती चुरशीची होणार आहे. आदिकांचे समर्थक असलेले दोन उमेदवार या निवडणूक शेतकरी संघटना व डॉ. वंदना मुरकुटे यांच्या पॅनलमध्ये आहेत.

अनुराधा आदिक यांनी रविवारी (ता. 2) उक्कलगाव, एकलहरे व टाकळीभान येथील सभासद मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच प्रगतिशिल शेतकरी भास्करराव कोकणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, अशोक कारखान्याच्या निवडणुकीत आपण सक्रिय भूमिका बजावणार आहोत. (स्व.) आदिक यांची पुण्याई व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाच वर्षे श्रीरामपूर नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. त्याच पद्धतीने अशोक कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यक्षेत्रात असलेल्या पाचही गटांतील सभासदांच्या गाठीभेटी घेऊन मतदार संघ पिंजून काढू.

आदिक यांनीही आता निवडणुकीच्या प्रचारात एन्ट्री केल्याने चुरस वाढली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, इंद्रनाथ थोरात, ज्ञानदेव थोरात, जितेंद्र भोसले, अर्चना पानसरे, भगीरथ जाधव, विष्णुपंत खंडागळे, रईस जाहगीरदार, राजेंद्र पानसरे, देविदास कोकणे, जयकर मगर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT