Anuradha Nagwade speaking in the Congress movement
Anuradha Nagwade speaking in the Congress movement Sanjay A. Kate
पश्चिम महाराष्ट्र

अनुराधा नागवडे म्हणाल्या, भाजप घाणेरडे राजकारण करतेय

संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : श्रीगोंदे येथे अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस, तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस व तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शेतकरी विरोधी कृत्यांच्या तसेच पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेध आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी केले. या प्रसंगी नागवडे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. Anuradha Nagwade said, BJP is doing dirty politics

अनुराधा नागवडे म्हणाल्या, उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्याच्या मुलाला भाजपवाल्यांनी चिरडून मारले. त्या कुटूंबाची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली. केंद्रातील भाजप सरकार घाणेरडे राजकारण करीत असल्याचा आरोप नागवडे यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो अतिशय भयावह होता. ज्यात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने आपल्या कारने शेतकऱ्यांना चिरडले आहे. प्रियंका गांधी शहीद शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना भेटायला जात होत्या, तेव्हा त्यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांना अटक करण्यात आली. आम्ही या अराजकतेला, हुकूमशाही प्रवृत्तीला आम्ही निषेध करतो. सद्यस्थितीला जेव्हा भाजप सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरत आहे, तेव्हा भाजपचे लोक अशा घाणेरड्या राजकारणावर उतरले आहेत, असे नागवडे यांनी सांगितले.

या प्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील भोसले, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, जिल्हा सरचिटणीस बाळाप्पा पाचपुते, सुरेखा लकडे, नगरसेवक सतीश मखरे, प्रशांत गोरे, गणेश भोस, समीर बोरा, संतोष कोथंबीरे, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष आदिल शेख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सकलेन शेख, शहराध्यक्ष धीरज खेतमाळीस, भूषण शेळके, नंदकुमार ससाणे, अजय रंधवे, सागर बेल्हेकर, किरण चव्हाण आदी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT