Ahmednagar News : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar News : मला आमदार व्हायचयं; शेतकरी पुत्राची थेट राज्यपालांना विनंती!

Farmer's son Letter To Governor : आमदार म्हणून माझी नियुक्ती केल्यास मिळणाऱ्या मानधना मधून केवळ 1 रू. (एक रुपया) प्रतिमाह मानधन स्वतःसाठी घेईन!

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राज्यात मुख्यमंत्रीपदावर असताना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवरील बारा आमदारांच्या निवडीबाबतचा विषय सर्वाधिक चर्चेत असलेला विषय होता. वादग्रत ठरलेले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी शेवटपर्यंत बारा आमदारांची नियुक्ती केलीच नाही.

आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत यात नव्या नियुक्त्या करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. हा विषय चर्चेत असतानाच बीड जिल्ह्यात शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या एका युवकाने थेट राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवून, नियुक्त होणाऱ्या बारा जागांत आपली नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली आहे.

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील श्रीकांत विष्णू गदळे या युवा शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये आपण शेतकरी कुटुंबातील असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करत असल्याचे म्हंटले आहे. शेतकऱ्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी तसेच जनतेचा आवाज सभागृहात मांडण्यासाठी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर आमदारपदी नियुक्ती व्हावी, अशी मागणी सामाजिक गदळे यांची आहे.

विधानपरिषदेवर नियुक्ती साठी गदळे दोन वर्षांपासून राज्यपाल कार्यालयाशी संपर्क करत आहेत. दहा ते बारा वर्षापासून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, उपेक्षित घटक, विधवा परित्यक्ता महिला वरील होणारा अन्याय-अत्याचार, शिक्षण, आरोग्य, निसर्ग समतोल अशा विविध विषयावर काम करत आहे. मात्र काम करत असताना माझ्याकडे कसल्याही प्रकारचे पद नसल्यामुळे मला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे आपली विधानपरिषदेवर नियुक्ती व्हावी, अशी गदळे यांची अपेक्षा आहे.

विधानपरिषदेवर आमदार म्हणून माझी नियुक्ती केल्यास मिळणाऱ्या मानधना मधून केवळ 1 रू. (एक रुपया) प्रतिमाह मानधन स्वतःसाठी महाराष्ट्र शासनाचा सन्मान म्हणून घेईन आणि उर्वरित मानधन रक्कम गोरगरीब, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी यांच्या कल्याणासाठी शासनाच्या तिजोरीत जमा करेल, असे हमीपत्र त्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या विनंती पत्रासोबत जोडले आहेत.

माध्यमात येणाऱ्या वृत्तांनुसार महायुतीतील बारा जागांसाठी भाजप सहा जागा, शिंदेंची शिवसेना तीन जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तीन जागा, असा फॉर्म्युला ठरल्याचे कळत आहे. आता राज्यपाल आर्जव करणाऱ्या या युवकाला बारा जागांत संधी देतात का? की शेतकऱ्यांचे पुत्र म्हणणारे राजकीय पक्षातले सत्तेतील नेते मंडळी या युवा शेतकऱ्याला संधी देतात की गदळे यांच्या अपेक्षित मागणीला वाटाण्याच्या अक्षता पदरी पडतात, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT