पुणे : अजित पवार (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) झाल्याने मी नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही. मीच पक्षाचा अध्यक्ष आहे ना. मग मी नाराज कोणावर होणार? पक्षाचा अध्यक्ष असं कसं करू शकतो. अजितदादांची विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि संपूर्ण नेत्यांनी मिळून नियुक्ती केलेली आहे, त्यामुळे अशा बातम्या कोठून येतात, हेच कळंत नाही, असा उलटा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. (Are you upset about Ajit Pawar being the Leader of Opposition? Jayant Patil said...)
पुणे महापालिकेच्या आठही विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रमुख नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांना अजित पवार विरोधी पक्ष झाल्यानंतर तुम्ही नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाटील यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, अजित पवार विरोधी पक्षनेते झाल्यापासून मी नाराज आहे, हे सध्या माझ्याकडे बघून वाटतंय का? अजितदादांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा झाल्यापासून मी अलिप्त नव्हतो. मी माझ्या मतदारसंघात नगरपालिका निवडणुकीची तयारी करायला मी पूर्णवेळ प्रत्येक वॉर्डनिहाय बैठका घेत होतो. त्यामुळे मी अलिप्त राहण्याचा प्रश्नच नाही. मीच पक्षाचा अध्यक्ष आहे ना. मी नाराज कोणावर आहे. पक्षाचा अध्यक्ष असं कसं करू शकतो.
गेल्या ३६ दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या दोघांनीच मिळून ७०० ते ७५० निर्णय घेतले. त्यांच्या कारभाराकडे राज्यातील जनता पाहत आहे. घटनेतील तरतुदीनुसार किमान बारा ती मंत्री मंत्रिमंडळात असावेत, असे संकेत आहेत. या दोघांनी निवडणुका पुढे ढकलल्या. आता या सरकारने घाबरून वॉर्डरचना बदलायची आहे. कोणत्या वर्षाच्या लोकसंख्येच्या मोजणीवर आधारित निवडणुका घ्यायच्या, याविषयी नवा अध्यादेश काढला आहे. भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येऊन जी कृती केली आहे, त्यांना त्याचे समर्थन समाजात आहे की नाही हे बघायचे असेल तर त्यांनी तातडीने महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांचा निवडणुका लावल्या पाहिजेत. अगोदर झालेली वॉर्डरचना आणि आरक्षण पुन्हा करणे, हे सर्वोच्च न्यायालय मान्य करेल, असे मला वाटत नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.