K Chandrashekhar Rao News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

KCR In Kolhapur News : कोल्हापूरात दाखल होताच चंद्रशेखर राव यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन..

Kolhapur : विशेष बसमधून ते अंबाबाई मंदिरात आले. त्यांच्यासोबत गाड्यांचा मोठा ताफा देखील होता.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra : भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांचे आज कोल्हापूरात आगमन झाले. `तेलंगणा पॅटर्न` आणि `अब की बार किसान सरकार`, या घोषणेसह त्यांच्या बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात वाटचाल सुरू केली आहे. (KCR In Kolhapur News) त्यामुळे त्यांच्या कोल्हापूरातील एन्ट्रीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. राव यांना पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी त्यांच्या मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती.

राव (K.Chandrashekar Rao) यांनी देखील स्वागतासाठी उभ्या असलेल्या नागरीकांना हात वर करून प्रतिसाद दिला. शहरात दाखल होताच त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. (Kolhapur) यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार भारत भालके हे देखील होते. केसीआर आज सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दुपारी १२ वाजता कोल्हापूर विमानतळावरावर राव यांचे आगमन झाले.

विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तेथून विशेष बसमधून ते अंबाबाई मंदिरात आले. (Maharashtra) त्यांच्यासोबत गाड्यांचा मोठा ताफा देखील होता. त्यामुळे लोक उत्सुकतेपोटी रस्त्याच्या दुतर्फा थांबले होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना हात करून राव प्रतिसाद देत होते. राव हे अंबाबाईचे भक्त आहेत, यापूर्वी कुटुंबासह ते दर्शनासाठी आले होते.

आजही कोल्हापूर मध्ये आल्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र माध्यमांना टाळत ते सांगलीकडे रवाना झाले. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून साठे कुटुंबीयांना भेटणार आहेत. यावेळी साठे कुटुंबीयांच्या वतीने त्यांचा सत्कारही केला जाणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT