The cornerstone was removed
The cornerstone was removed Sanjay A. Kate
पश्चिम महाराष्ट्र

पालकमंत्र्यांची पाठ फिरताच कोनशिला निघाली

संजय आ. काटे

श्रीगोंदे ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन दिवसांपुर्वी शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू निर्मिती सयंत्राचे उदघाटन झाले. त्यासाठी आमदार पाचपुते यांनी स्थानिक विकास निधी दिला आहे. या कोनशिलेवर पाचपुते यांचे नाव खालच्या बाजूला टाकले गेल्याने संतप्त झालेल्या पाचपुते यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत विधानसभेत हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता. As soon as the Guardian Minister turned his back, the cornerstone was removed

अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी काष्टी येथे येत पाचपुते यांची मनधरणी केली होती. तथापि पाचपुते ती कोनशिला बदला या मतावर ठाम राहिल्याचे समजले. त्यातच भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोनशिलेबाबत इशारा दिल्याचे समजले. दरम्यान आज दुपारनंतर ती कोनशिला तेथून गायब झाली आहे.

शहरातील ग्रामीण रुग्णालयात बसविलेल्या ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन केल्यानंतर तेथील कोनशिलेवर उपस्थितीत नसणाऱ्या मंत्र्यांचे नावे वरच्या बाजूला आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव खाली टाकल्याचा वाद वाढण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार या पाचपुतेंच्या इशाऱ्याचा धसका घेवून ती कोनशिला तेथून गायब झाली आहे. ती कुणाच्या आदेशावरुन काढली हे समजले नसले तरी ग्रामिण रुग्णालयाने ती काढल्याचे मान्य केले. आता पालकमंत्री व सरकारचाच अपमान झाला नाही का अशी चर्चा सुरु आहे.

या परिसरात कोरोना केंद्र व प्राणवायू निर्मिती संयत्र असे दोन प्रकल्प आहेत. दोन्ही ठिकाणी लावलेल्या कोनशिला गायब झाल्या आहेत. त्यामुळे आमदार पाचपुते यांच्या इशाऱ्याला घाबरुन त्या कोनशिला काढून टाकल्या असल्याचे समजले. मात्र आता पालकमंत्र्यांनी केलेल्या उदघाटनाची कोनशिला काढून टाकल्याने त्यांचा व पर्यायाने सरकारचाच अपमान झाला नाही का असा प्रश्न पुढे आल्याने हा मुद्दा चिघळण्याची भीती आहे.

दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संघर्ष राजूळे यांना विचारले असता, एक कोनशिला अज्ञान व्यक्तींनी फोडली होती. त्यामुळे आम्ही दुसरी काढून टाकल्याचे उत्तर दिले. कोनशिला काढण्यासाठी कुणाचा आदेश अथवा सूचना होती असे विचारल्यावर त्यांनी स्पष्ट काही सांगितले नाही. दरम्यान जी कोनशिला फोडली त्याबद्दल पोलिसात तक्रार दिली का या प्रश्नावरही त्यांनी नकारअर्थी उत्तर दिल्याने सगळाच गोंधळ असल्याचे समोर येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT