अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून कोरोना ( Corona ) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश काढत निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दिवसा जमाव बंदी तर रात्रीची संचारबंदी राहणार आहे.As the number of corona patients increased in the Nagar district, new restrictions were imposed
अहमदनगर जिल्ह्यात काल 272 जण कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नवीन आदेश काढले आहेत. हे आदेश आज पहाटेपासूनच लागू झाले आहेत. या आदेशानुसार पहाटे पाच ते रात्री 11 वाजेपर्यंत 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच रात्री 11 ते पहाटे 5 या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांतही सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय बैठका आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यास सांगण्यात आले आहे.
खासगी कार्यालयांना 50 टक्केच उपस्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासगी कार्यालय व्यवस्थापनाने त्यासाठी शिफ्ट करून कामकाज करण्यास सांगितले आहे. लग्नसमारंभात 50 व्यक्ती, अंत्यविधीला 20 व्यक्ती, सामाजिक-धार्मिक-सांस्कृतीक व राजकीय कार्यक्रमाला केवळ 50 व्यक्तीचीच उपस्थिती मर्यादा राहणार आहे. शाळा, महाविद्यालये, क्लास 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. जलतरण तलाव, स्पा, वेलनेस सेंटर बंद ठेवावे लागणार आहेत.
हेअर सलून, ब्युटी पार्लर सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत खुले ठेवता येतील. मात्र तेथेही 50 टक्के उपस्थितीचे निर्बंध लावण्यात आले आहेत. हाच नियम शॉपिंग मॉल, बाजर संकुले, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायामशाळा व जिमलाही लागू राहील. मनोरंजन पार्क, संग्रहालये, किल्ले, पर्यटन स्थळे बंद राहणार आहेत. उपहारगृहांत 50 टक्के लोकांच्याच उपस्थितीला परवानगी राहणार आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच उपहारगृहांत प्रवेश मिळेल. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येईल, असे आदेशात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.