eknath shinde (5).jpg sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde : पंढरपुरातून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; विठुरायाच्या दर्शनाची 'वेटिंग' संपणार

Eknath Shinde Pandharpur Wari 2024 : मागील वर्षापेक्षा वारकऱ्यांची संख्या 30 टक्के अधिक वाढली आहे. अनेक योजना नागरिकांना दिल्या आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादानं हे सरकार आपला कारभार करत आहे

Akshay Sabale

Ashadhi wari 2024 : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी नाशिकमधील सटाणा तालुक्यातील अंबासन या गावचे रहिवाशी बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या शेतकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्यात मान मिळाला आहे.

विठुरायाची पूजा झाल्यानंतर सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मोठी घोषणा केली आहे. "तिरूपती बालाजीच्या धर्तीवर विठ्ठल मंदिरात टोकण दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येईल. यासाठी 103 कोटींचा निधी दिला जाईल," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, "पंढरपुरला विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना विठुरायाचे सुलभ आणि कमीत-कमी वेळेत पदस्पर्श दर्शन घेता यावे म्हणून तिरूपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकण दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येईल. त्यासाठी सरकारकडून 103 कोटी रूपयांचा निधी लवकरच दिला जाईल."

"वारी हा आनंदाचा दिवस आहे. सलग तिसऱ्यांदा मला देवाची पूजा करण्याचा मान मला मिळाला आहे. ही पांडुरंगाची कृपा आहे. मागील वर्षापेक्षा वारकऱ्यांची संख्या 30 टक्के अधिक वाढली आहे. अनेक योजना नागरिकांना दिल्या आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादानं हे सरकार आपला कारभार करत आहे," असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.

"पांडुरंग हा सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे. सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे. त्यामुळे कुठेही काहीही कमी पडणार नाही. पंढरपुरात लाखो लोक येतात. त्यामुळे एक हजार बेडचं रूग्णालय पंढपुरात करण्यात येणार आहे. विकासाचे काम सरकारच्या माध्यमातून केले जाईल," असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT