Ashok Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ashok Chavan In Bjp : चव्हाण भाजपमध्ये; काँग्रेस आमदार म्हणाला, 'हा काही धक्का नाही'

Ashok Chavan Joins Bjp congress Mla Reaction : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसमध्ये अस्वस्थता...

Rahul Gadkar

Kolhapur Politics Latest News :

राजकारणात गेल्या पाच वर्षांत इतकी स्थित्यंतर बघितले आहेत की, आता धक्का बसणं बंद झाले आहे. जे होईल त्यातून मार्ग काढायचा, अशी आमची मानसिकता आता झाली आहे. काल कोणीतरी पान टपरीवर बसून आमदारांची यादी तयार केली असेल, असा उपरोधिक टोला Congress चे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी लगावला आहे.

कालपासून मला विचारणा होतेय, पण माझ्या राजीनाम्याच्या बातमीत कोणतेही तथ्य नाही. पक्षाचा कोणीही आमदार राजीनामा देणार नाही किंवा दुसऱ्या पक्षात जाणार नाही. अशोकराव चव्हाण यांचे वलय आहे. त्यांच्या विचारांचे कोणीतरी राजीनामे दिले असतील. जे पक्षाच्या विचारांशी जोडलेले आहेत. ते काँग्रेस सोडतील असे वाटत नाही, असा दावा आमदार कुणाल पाटील यांनी केला.

राजकारणात गेल्या पाच वर्षांत इतकी स्थित्यंतरं बघितली आहेत, की आता धक्का बसणे बंद झाले आहे. जे होईल त्यातून मार्ग काढायचा, अशी आमची मानसिकता आता झाली आहे. काल कोणीतरी पान टपरीवर बसून आमदारांची यादी तयार केली आहे. यादीमध्ये नाव असलेल्या सहकाऱ्यांशी बोललो. आपण ठाम आहोत, असंच त्यांनी सांगितल्याचे आमदार कुणाल पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चव्हाण एकटे आहेत असे मी म्हणत नाही. त्यांच्या विचारांशी जोडलेले लोक त्यांच्या सोबत असतील. असे चढ-उतार येत असतात. भाजपमध्ये दहा-पंधरा वर्षांपूर्वी कोणीही मोठा नेता नव्हता. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर भाजपची वाटचाल सुरू झाली, असे ते म्हणाले.

पक्ष हा एक विचार असतो. अशी परिस्थिती येते. तेव्हा पक्षात नवीन नेतृत्व तयार होते. राज्यात सरकार नसते तेव्हा कामात अडचणी येतात ही वस्तुस्थिती आहे. सत्तेत नसला की पक्षाकडे तुम्हाला द्यायला ताकत नसते. अशावेळी आपण पक्षासोबत राहायचे असते. मी तिसऱ्या पिढीची काँग्रेस आहे. त्यामुळे मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले.

edited by sachin fulpagare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT