Ganesh Mandals sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Election : इच्छुकांचा सायलेंट प्रचार'वॉर', विधानसभेसाठी पैशांचा पाऊस

Rahul Gadkar

Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व इच्छुकांनी आत्तापासूनच आर्थिक हात सैल सोडलेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तरुणांना आणि सार्वजनिक तरुण मंडळातील कार्यकर्त्यांना हाताशी धरण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे. त्यामुळे गल्लीबोळातील आणि प्रशस्त तालीम, पेठातील मंडळांना आकर्षित करण्याचे काम विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांकडून सुरू आहे.

इच्छुकांकडून सार्वजनिक मंडळांवर हजारोपासून ते लाखोपर्यंतच्या वर्गणी देण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच सार्वजनिक तरुण मंडळाचे भाव चांगलेच वाढताना दिसत आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. सार्वजनिक तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेतील निवडणुकीसाठी इच्छुक तसेच आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकीतील इच्छुकांना घेरले आहे.

गणेशोत्सवात गणेशाच्या आगमना दिवसापासून ते विसर्जनापर्यंत तरुण मंडळाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंडळांनी इच्छुकांvकडून हजारो रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत वर्गणी जमा केली आहे. त्या बदलेत इच्छुक उमेदवारांना त्या उपक्रमाचा उद्घाटन करण्याचा मान मिळतो आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक तरुण मंडळांनी यंदा दहा दिवसाच्या कालावधीत महाप्रसादाच्या आयोजन केले आहे. प्रमुख पाहुणा म्हणून विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांना आमंत्रित केले जात आहे. त्यामुळे मंडळाच्या मागे उभे राहिलेला उमेदवार कोण? याची उत्सुकता त्या भागातील नागरिकांना लागलेली आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT