Solapur, 11 July : सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या खास शैलीत दक्षिण सोलापूर मतदारसंघाबरोबरच इतरही अनेक प्रश्न उपस्थित केले. शेवटी त्यांनी भीमा नदीकाठच्या वीजपुरवठ्याचा विषय मांडला. तो मांडताना आम्हाला वेदना होतात. मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि महसूल मंत्र्यांना बोललो. पण कलेक्टर तुम्ही स्वतःवर घेऊ नका. पण आम्ही सांगितले की राग येतो, असे म्हणताच पालकमंत्री जयकुमार गोरेंनी ‘बापू बापू’ म्हणत वीजपुरवठ्याचा विषय माझ्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित नव्हता. तो मंत्रिमंडळाचा विषय होता. आता मंत्रिमंडळाने पाच तास वीजपुरवठ्यास मान्यता दिल्याचे सांगितले.
ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पाडली. त्या बैठकीच्या सुरवातीलाच सुभाष देशमुख यांनी आपल्या खास शैलीत बॅटिंग करायला सुरुवात केली.
त्यांनी आपल्या मतदारसंघातील प्रेक्षणीय स्थळं, विरंगुळा केंद्र, नाना-नानी पार्क आदींची घोषणा झाली आहे. पण काम अजूनही झाले नाही. ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. 74 नाले, आदिला नदी याबाबतचे विषय मांडले. ते बोलत असतानाच सुभाषबापू जिल्हाधिकाऱ्यांकडे वळले.
दक्षिण सोलापूर हा माझा मतदारसंघ सीमावर्ती भागात आहे. सरकारने आम्हाला 2000 कोटी रुपये दिले आहेत. पण भीमा नदी काठात केवळ दोनच तास वीज होती. या विषयावर दोन वेळा बोललो, मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, ऊर्जा सचिवांना बोललो. पण प्रश्न मार्गी लागला नाही. कलेक्टरसाहेब तुम्ही स्वतःवर घेऊ नका. आम्हाला वेदना होतात. आम्ही सांगितले की राग येतो, असे सुभाष देशमुख म्हणताच पालकमंत्री गोरे यांनी बापू बापू म्हणत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.
पालकमंत्री गोरे म्हणाले, भीमा नदीकाठच्या विजेचा प्रश्न माझ्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येत नाही. तो विषय मंत्रिमंडळाचा होता. पाऊस नसल्याने सुरुवातीला तो विषय होता. पाणी हे सामुदायिक संकट आहे. पण शेतकऱ्यांचेही नुकसान करण्याचे कोणतेही कारण नाही. पण मंत्रिमंडळाने आता नदीकाठी पाच तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून तशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.