Atpadi Bazar Samiti : आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडताना, विधानपरिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichanda Padalkar) व काळेवाडी गाव येथील एका यांच्यात वादावादी झाल्याची माहिती आहे. आमदार पडळकर आणि काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. मतदान शांततेत पार पडणे अपेक्षित असताना, या घटनेमुळे मतदानाला गालबोट लागले.
आटपाडी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान अतिशय चुरशीची सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी सत्तेत असलेली भाजपा आणि राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधातएकनाथ शिंदेंची शिवसेना, काँग्रेस, रासप यांच्याध्येच टोकाचा संघर्ष आहे. या ठिकाणी सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या, मतदान उत्साहात पार पडत होते. मध्यान्ही १२ वाजेपर्यंत ७० % मतदान पूर्ण झाले आहे.
११ वाजण्याच्या सुमारास दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांकडून बाचाबाची झाली होती. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांच्या कानाखाली लगावली. यामुळे इथे वातावरण तणावाचे बनले होते.
संबंधित मतदान केंद्राच्या बाहेर, एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात मतदारांच्या चारचाकी वाहने महामार्गाच्या दोन्ही बाजूला, याचा परिणाम म्हणजेमोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.