BJP Leader-HoneyTrap
BJP Leader-HoneyTrap Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजपच्या बड्या नेत्यावर 'हनिट्रॅप'चे जाळे : मुंबईत घर, दोन कोटींची केली मागणी

सूरज सावंत

मुंबई : मुंबईतील एका महिलेने भारतीय जनता पक्षाच्या (BJP Leader) नेत्याच्या विरोधात हनिट्रॅप (Honeytrap) लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा नेता सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील असून तो मोठ्या पदावर कार्यरत आहे. या प्रकरणी संबंधित नेत्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित महिला राजकीय नेत्याची नातेवाईकचे असल्याचे सांगण्यात येत आहे. (Attempt to trap big BJP leader in Solapur in 'Honeytrap')

भारतीय जनता पक्षाचा हा नेता सोलापूर जिल्ह्यातील राहणारा आहे. तो नेता सोलापूर जिल्ह्यात पक्षाच्या मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्या नेत्याने दिलेल्या तक्रारीत संशयित आरोपी महिला ही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत मुंबईत घर आणि दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या नेत्याकडून संबंधित संशयित आरोपी महिलेने या पूर्वी टप्याटप्प्याने १ लाख ७८ हजार ‘फोन पे’च्या माध्यमातून आणि दोन लाख रुपये रोखीने स्वीकारल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

ती महिला एवढ्यावरच थांबली नाही. तर संबंधित महिलेने त्या नेत्याला बोलावून राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात बदनामी करण्याची धमकीही दिली आहे, असे संबंधित नेत्याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित संशयित आरोपी महिला ही राजकीय नेत्याची नातेवाईकचं असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या राजकीय नेत्याने दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेविरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात भादंवि कम ३८४, ३४१, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT